FDA On BMC Canteenमुंबई महापालिका कँटिनवर FDA चा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील कऱण्याचे निर्देश .

FDA On BMC Canteen : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कँटीनमध्ये ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोप आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात घेऊन संबंधित कँटिन सील कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकऱणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : 23-07-2026

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यभरात अन्नसुरक्षेसंदर्भात व्यापक (FDA On BMC Canteen)  तपासणी मोहीम राबवत असून, निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करत आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबईतीली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयातील कँटीन तात्काळ बंद करून सील कऱण्याचे आदेश FDA ने दिले आहेत.

ताकाच्या ग्लासमध्ये माशी आढळल्याने कारवाई (FDA On BMC Canteen)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कँटिनमध्ये ताकाच्या ग्लालमध्ये माशी आढळल्याती घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कँटिन सील कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तक्रारीनंतर FDA अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास कँटिनची सखोल तपासणी केली.

तपासारदरम्यान स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळ्याने कँटीनचे संचालक कमल कॅटरर्स यांना ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावण्यात आली आणि कँटीन सील कऱण्याचे आदेश देण्यात आले.

BMC कडूनही 50 हजारांचा दंड (FDA On BMC Canteen)

या प्रकरणाची गंभीर दखल घेत BMC च्या आरोग्य आणि कामगार विभागाने संबंधित ठेकेदारांवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेत निष्काळजीपणा केल्याबद्दल ही कारवाई कऱण्यात आली.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम (FDA On BMC Canteen)

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभर अन्नसुरक्षा तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत यापूर्वी KEM रूग्णालयाच्या कँटीनसह अनेक खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वीही अनेक ठिकाणी धडक कारवाई (FDA On BMC Canteen)

पुण्याच्या सिया गोयल हीच्या कुटुंबांच्या मसाले आणि सुका मेवा विक्रीच्या दुकानाला कथित नियमभंगामुळे व्यवसाय बंद कऱण्याची नोटीस देण्यात आली होती. तसेच मुंबईतील प्रसिद्घ K.Rustom Ice Cream parlour चा फूड लायसन्स उंदीर आणि माश्या आढळ्याच्या तक्रारीनंतर निलंबित कऱण्यात आला होता.

याशिवाय, राज्यातील विविध भागांत भेसळयुक्त दूध आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातही FDA सातत्याने कारवाई करत आहे. FDA ने नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहण्याचे आणि कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ प्रशासनाकडे नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेनंतर BMC प्रशासनालाही कँटीनमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. चौकशी अहवालानंतर आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!