Rain Update 2026येतो येतो म्हणता अखेर आला ! भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस, अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा (फोटो -सोशलमीडिया, संग्रहित )

Rain Update 2026 : भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम, मेघालय आणि सिक्किमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वादळे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : 19-06-2026

पश्चिमी विक्षोभ, चक्रिय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात (Rain Update 2026 ) वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.

देशातील हवामान पुन्हा एकदा वेगाने बदलणार आहे. नवीन पश्चिमी विक्षोभ, चक्रिय वारे आणि सक्रिय नैऋत्य मान्सूनच्या एकत्रित प्रबावामुळे वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम, मेघालय आणि सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर कऱण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 18 जूनपासून सक्रिय असलेल्या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीचा वायव्य भारतातील हवामानावर परिणाम होईल. देशाच्या विविध भागांमध्ये इतर हवामान प्रणाली देखील सक्रिय आहेत, ज्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामानाचे स्वरूप वेगवेगळे दिसून येत आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे, तर इतर भागांमध्ये आद्रता आणि उष्णतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये.  (Rain Update 2026)

किनारपट्टी भागातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीच्या प्रभावामुळे, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मिर आणि चंदीगडमध्ये मेघगर्जनेसह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे सोसाच्याचे वारे वाहण्याची शक्याता आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मिरच्या काही भागांमध्ये गाररपिटीचीही शक्यता आहे. राजस्थानमधील हवामान अधिक तीव्र असू शकते.

दिल्ली एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण ( Rain Update 2026)

शुक्रवारी दिल्ली एनसीआरमध्ये दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी काही भागांमध्ये हलका पाऊस किंवा सरी येऊ शकतात. या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!