UGC NET Admit Card 2026यूजीसी नेट परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वितरण सुरू, प्रवेशपत्र डाऊनलोड करायच्या या आहेत सोप्या स्टेप्स.

UGC NET Admit Card 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 22 जून ते 30 जून 2026 या कालावधीत होणाऱ्या नेट परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

दिल्ली : 17-06-2026 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजीत केली जाणारी यूजीसी नेट (UGC-NET) परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ (सहाय्यक प्राध्यापक) पदाच्या पात्रतेसाठी आणि ‘ज्यूनिअर रिसर्च फेलोशिप’ साठी घेतली जाते. यावर्षी यूजीसी नेट जून 2026 परीक्षेचे आयोजन 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधी करण्यात आले आहे. या परीक्षेत बसणार्या उमेदवारांसाठी एनटीएने अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट वाटप (UGC NET Admit Card 2026) करण्यात आले आहे.

उमेदवार यूजीसी नेट जून 2026 परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta,nic.in वरून डाऊनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून ल़ॉगिन करावे लागणार आहे.

कसे कराल हॉल तिकीट डाऊनलोड ? (UGC NET Admit Card 2026)

  • 1 सर्वात आदी उमेदवाराने यूजीसीनेटच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जावे.
  • 2 होमपेजवर दिलेल्या ‘Candidate Activity’ या सेक्शनवर क्लिक करावे.
  • 3 त्यानंतर ‘UGC-NET June 2026 Exam Admit card’ या लिंकवर क्लिक करावे.
  • 4 आता तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि दिलेला सिक्युरिटी पिन टाकून लॉगिन करावे.
  • 5 आता तुमच्या स्क्रिनवर परीक्षेचे ॲडमिट कार्ड दिसेल.
  • 6 तुमचे ह़ॉल तिकीट तपासा, डाऊनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.

यूजीसी नेट परीक्षेचे स्वरूप आणि दोन पेपर्स (UGC NET Admit Card 2026)

ही परीक्षा 22 ते 30 जून दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर संगणक आधारित चाचणी (Computer Based Test-CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत एकूण दोन पेपर असतील. या परीक्षेसाठी दोन पेपर घेतले जातात.

पेपर 1 (सर्व सामान्य) : हा पेपर 100 गुणांचा असेल, ज्यामध्ये 50 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील.

पेपर 2 (विषय निहाय) : हा पेपर उमेदवाराच्या मुख्य विषयावर आधारित असेल, जो 200 गुणांचा असून त्यात 100 प्रश्न विचारले जातील.

महत्त्वाच्या सूचना : परीक्षा केंद्राच्या नियमांनुसार, वैध ॲडमिट कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा ह़़ॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी आपल्या हॉल तिकीटची मूळ प्रत आणि ओळखपत्र सोबत
ठेवणे अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!