Indian Victim Epstein FilesEpstein फाईलमध्ये एका भारतीय तरूणीचेही नाव, नव्या कागदपत्रांमध्ये खळबळजनक खुलासे ( फोटो-संग्रहीत, सोशलमीडियावरून )

Indian Victim Epistine Files : जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणाने जगभरात खळबळ उडाली आहे. त्याच्या कृत्याला फक्त परदेशातीलच नाही तर भारतातील तरूणीही बळी पडल्याचे समोर येत आहे. एका भारतीय तरूणीचाही समावेश असल्याची नवीन माहिती आत समोर आली आहे.

अमेरिका : 16-02-2026 

अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या  (Indian Victim Epstein Files ) मृत्यूनंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या बातम्यांमुळे जग हादरून जात आहे. त्याच्या लैंगिक तस्करीच्या भयानक कृत्यांनी आता सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या या कागदपत्रांमधून एक नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या नव्या कागदपत्रांनुसार, एक भारतीय तरूणी देखील जेफ्रीच्या छळाला बळी पडली आहे. या खुलाशाने जगभरात खळबळ माजली आहे.

भारतीय तरूणीचा शोध सुरू  ( Indian Victim Epstein Files)

नव्या कागदपत्रांनुसार, एपस्टीनच्या लैंगिक गुन्हेगारीला एक भारतीय तरूणी बळी पडल्याचे समोर आले आहे. 13 जानेवारी 2020 मध्ये झालेल्या एका ई-मेलमध्ये, अमेरिकन अधिकारी या भारतीय मुलीचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन अधिकारी व्हिक्टिम्स फंड द्वारे तरूणीचा शोध घेत होते.

या ई-मेलद्वारे भारतातील अमेरिकन दूतवासाला तरूणीचा पत्ता आणि संपर्क माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आले होते. नूयॉर्क क्राईम व्हिक्टिम्स कॉम्पेन्शनच्या माध्यमातून या तरूणीला नूकसान भरपाई आणि थेरपीच्या सहाय्याने मदत करण्याचा प्रयत्न अमेरिकन अधिकारी करत आहेत. ई-मेल भारतातील अमेरिकन दूतवासाला 20१९ मध्ये एपस्टीनच्या मृत्यूनंतर पाठवण्यात आला होता.

ई-मेलमध्ये भारतीयांची नावे   ( Indian Victim Epstein Files)

ई-मेलमध्ये केवळ अमेरिकेसह भारतातील अधिकाऱ्यांचीही नावे समोर आली आहेत. बिल गेटस आणि एपस्टिनमध्ये झालेल्या 5 जून 2014 मधील ई-मेलनुसार भारतीय केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या एपस्टीनशी भेट झाल्याचाही उल्लेख आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याही एपस्टीनशी भेटीचा उल्लेख यामध्ये आढळून आला आहे.

याशिवाय भारतातील मोठ्या PR कंपनीचे प्रमोटर दिलीप चेरियन यांचेही या फाईलमध्ये नाव आहे. एपस्टीनने दिलिप चेरियन याला भेटण्यासाठी 2 एप्रिल 2017 रोजी एक ई-मेल पाठलला होता. या ई-मेल मध्ये दिलिप पॅरिसमध्ये असताना जेफ्रीची भेट घेणार असल्याचा संदर्भ होता.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!