Ajit Dada Pawarकात्रज दूध संघाला 'अजितदादा पवार' यांचं नाव देण्याचा निर्णय.

Ajit dada Pawar : कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कात्रज दूध संघाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. यापुढे कात्रज दूध संघाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. यापुढे कात्रज दूध संघाचे नाव अजित दादा पवार दूध संघ असे असेल.

पुणे : 02-02-2026

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला आता ‘अजितदादा पवार ‘ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’  (Ajit dada Pawar) असे नाव देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. शनिवारी (ता.31) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर कऱण्यात आला. बुधवारी 28 जानेवारीला सहकार क्षेत्रातील जेष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सहकारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

पुणे जिल्ह्यातील सहकारी चळवळीकरिता आणि विशेषतः कात्रज दूध संघासाठी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली. संघ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

संघाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहून त्यांनी संघटनेच्या कामकाजासाठी, तिच्या विस्तार योजनेसाठी आणि प्रशासकीय समन्वयासाठी महत्त्वाचे धडे दिले. पवार कुटुंबाच्या विविध सहकारी आणि संघ उपक्रमांना त्यांच्या सहकार्याचा सतत फायदा होत आहे.

अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वाचे ( Ajit dada Pawar )

संघाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये, विशेषतः पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत आणि दिर्घकालीन नियोजनात अजितदादा पवार यांची भूमिका खुप महत्त्वाची होती. संघाच्या अधिकाऱ्यांनी अशी भावना व्यक्त केली की त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थात्मक बळकटीकरण, सहकारी संस्थांचे सक्षमीकऱणे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी दिर्घकालीन विकासाचे त्यांचे व्यापक दृष्टिकोन.

संघाचे अध्यक्ष ॲड. उपाध्यक्ष तानाजी जगताप यांच्यासह संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान पासलकर, दिलीप थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरूण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे, स्वप्निल धामधारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रिकाम्या बैठकींमध्ये राहिले असते. उपस्थित संचालकांनी या नामकरणाच्या निर्णयास एकमताने मंजुरी दिली.

हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी केलेल्या अजितदादा यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाची स्मृती कायम जपण्याचा प्रयत्न आहे. नामकरणाशी संंबधित पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्या पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे संघाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!