Sunetra Pawarसुनेत्रा पवार मुंबईत दाखल, राजकीय हालचालींना वेग (फोटो-संग्रहीत, सोशलमीडिया)

Sunetra Pawar  : राज्याचे उममुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा जय पवार हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड होणार आहे.

मुंबई : 31-01-2026

उपमुख्यमंत्री अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र धक्क्यात असताना, आता राजकीय घडामोडींना राज्यात वेग आला आहे. बुधवारी अजित दादा यांचे विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी (29 जानेवारी ) बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांर्गत घडामोडींना आता वेग आला आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

काल मध्यरात्री सुनेत्रा पवार या जय पवार यांच्यासह मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत नरेश अरोरा हे देखील आहेत. आज दुपारी विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. तर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

दरम्यान आजच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक आमदारही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. अनेक आमदार आज थोड्याच वेळात मुंबईत दाखल होतील आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे. एकंदरच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका सुनेत्रा पवारांनी घेतली – प्रताप पाटील चिखलीकर (Sunetra Pawar)

आज राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांचे नाव निश्चित होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी वहिनींचे अभिनंदन करेन. एवढा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आणि महाराष्ट्रावर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या सगळ्या गोष्टीला संमती दिली, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.

कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका एक मायेचा आधार कसा द्यावा ही भूमिका वहिनी घेतील त्याबद्दल मी वहिनींचे आभार मानतो. आमच्या सगळ्या भावना आपण ओळखल्या, आमच्या महाराष्ट्र म्हणून जे मान्यता दिली त्याबद्दल मी अंतःकरणापासून वहिनीचा आभारी आहे असंही त्यांनी नमूद केले.

आज होणार महत्त्वाती बैठक (Sunetra Pawar)

काल दिवसभरात छगन भूजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.

आज दुपारी दोन वाजता विधान भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रायी अध्यक्षपदी निवड होईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!