Ajit Pawar Final Ritualमहाराष्ट्राचे लाडके 'दादा' पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी, हजारोंचा समुदाय शोकसागरात बुडाला

Ajit Pawar Final Ritual, Sad News : काल 28 जानेवारीला महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला. राज्याचे लाडके नेते, अजितदाद पवार यांचे अपघाती निधन झाले. आज त्यांच्यावर बारामती येथे लाखो कार्यकर्ते, राजकारणी आणि कुटुंबियांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वातावरण अत्यंत गंभिर आणि भावनिक होते.

बारामती : 29-01-2026 

राज्याचे लाडके ‘दादा’ आज अखेर पंचतत्वात विलीन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामती येथे शासकीय इतमामात (Ajit Pawar Final Ritual) अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

साश्रू नयनांनी निरोप (Ajit Pawar Final Ritual)

यावेळी कार्यकर्त्यांनी अजित दादा परत या, अजित दादा अमर रहे आणि महाराष्ट्राचा एकच वाघ,अजित दादा अशा घोषणांमधून स्पष्टपणे दिसून येत होते. अजित पवारांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. यावेळी बंदुकीची तीन वेळा सलामी देऊन त्यांना मानवंदना देण्यात आली. उपस्थित प्रत्येकाने शांततेत उभं राहून आपल्या नेत्याला ही अखेरची सलामी दिली. हा क्षण अत्यंत भावूक करणारा होता, जिथे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आणि एक दादा, अजित दादा या घोषणांनी वातावरण भारले होते.

अजित पवारांचे दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवार, पत्नी सुनेत्रा पवार, माननिय शरद पवार, प्रतिभाताई पवार, सुप्रिया सुळे इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दादांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!