Mumbai Monsoon Update 2025 : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईततर पावसामुळे पूरसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. मुंबई पोलीसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : 25/07/2025
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जाहीर केला आहे. पश्चिमी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी मध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईमध्ये शुक्रवार (25 जुलै) सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थीती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
पावसामुळे वाहतुक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे विभागातील काही उपनगरीय रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. मुंबईमध्ये दिवसभरात आणखी मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) ने सकाळी साडे आठ पासून मुसळधार पावसापेक्षाही जास्त पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रेड अलर्ट सांगण्यात आला आहे.
Table of Contents
घरांतून बाहेर पडू नका – मुंबई पोलीस ( Mumbai Monsoon Update 2025 )
मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आईएमडीने याआधीच मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये ऑरेंड अलर्ट जाहीर केला आहे. रायगड मध्ये शुक्रवारी रेड अलर्ट जाहीर केला आहे. गुरूवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होती. मात्र साधारण स्वरूपाचा पाऊस झाला.
गेटवे ऑफ इंडियावर पोलीस तैनात (Mumbai Monsoon Update 2025 )
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ समुद्राच्या मोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना समुद्राच्या जवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
Mumbai, Maharashtra: As heavy rainfall continues, high tides have been observed near the Gateway of India. Mumbai Police have been deployed at the location and are strictly preventing people from approaching the sea for safety reasons pic.twitter.com/3jqF0RHxKz
— IANS (@ians_india) July 25, 2025
मुंबई पोलीसांनी केले आवाहन ( Mumbai Monsoon Update 2025 )
आपल्या एक्स अकाऊंटवरून मुंबई पोलीसांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नका. समुद्राच्या भागात जाऊ नका. सावधानीने गाडी चालवा. पोलिसांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, आमचे कर्मचारी आणि अधिकारी पूर्णपणे सावधान आहेत आणि मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्ती वाटली तर, कृपया 100 / 112/103 या क्रमांकांवर संपर्क करा.
Maharashtra | Due to heavy rainfall in Mumbai and nearby districts, residents are advised to stay indoors unless absolutely necessary, avoid coastal areas, and drive cautiously. Our officials and staff are on high alert and ready to assist Mumbaikars. In case of any emergency,…
— ANI (@ANI) July 25, 2025
मुंबईतील वाहतूक झाली संथ (Mumbai Monsoon Update 2025 )
बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) च्या मान्सून रिपोर्टनुसार द्वीप शहरात 29.40 मिमी, पूर्वेकडील उपनगरांमध्ये 29.44 मिमी आणि पश्चिमी उपनगरांमध्ये आत्ता पर्यंत 18.88 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार कुलाबा मध्ये 22.4 मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 23.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सकाळपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली असून, वाहतूक संथ झाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मध्य रेल्वे नेटवर्कमुळे उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, पश्चिमी रेल्वे नेटवर्कवर काही लोकल रेल्वे 10-15 मिनीटं उशिरा धावल्या. मुंबई आणि शेजारील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात्या शक्यतेमुळे पोलीसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra: Mumbai has been experiencing heavy rainfall since last night, with high waves rising in the sea pic.twitter.com/8mEOBX10W9
— IANS (@ians_india) July 25, 2025
Leave a Reply