Rahul Gandhi Vs V.D.Savarakar : नुकतेच पुणे कोर्टाने राहुल गांधींची सावरकर कुटुंबाविषयीची फिर्याद रद्द केली आहे. कोर्टाने यासंदर्भातील मोठा निर्णय दिला आहे.
पुणे : 2025-06-01
सावरकर कुटुंबियांच्या मानहानीशी निगडीत असणाऱ्या केसमध्ये राहुल गांधींना (Rahul Gandhi )मोठा झटका बसला आहे. पुण्याच्या न्यायालयात याविषयीची केस सुरू आहे. पुणे न्यायालयाने राहुल गांधींनी या केस संदर्भात फिर्यादकर्ता सात्यकी सावरकर यांच्या मातृ पक्षाकडील वंशावळ मागितली होती. मात्र न्यायलयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात राहुल गांधींच्या या मागणीला नकार देत, हे प्रकरण भाषणाशी संबधीत असल्याने तसे करण्यास नकार दिला आहे. या निर्णयासह कोर्टाने राहुल गांधींची जामिन रद्द करण्याविषयीची मागणीसुद्धा फेटाळली आहे. म्हणजेच या केस मध्ये राहुल गांधींना झटक्यासह दिलासासुद्धा मिळाला आहे.
Table of Contents
काय आहे हे प्रकरण ?
हे प्रकरण मार्च 2023 मधील लंडन येथे राहुल गांधींच्या भाषणाने सुरू होते. या भाषणात राहुल गांधींनी (Rahul Gandhi ) स्वा.वि.दा.सावरकर यांच्याविषयी गंभीर टिका केली होती. त्यांनी त्यांच्या भाषणात एका पुस्तकाचा उल्लेख करत म्हटले होते की, या पुस्तकात सावरकरांनी (V.D.Savarakar ) म्हटले आहे की, आम्ही एका मुस्लिम माणसाला मारले आणि आम्हाला आनंद झाला होता. राहुल गांधींनी दिलेले संदर्भ आणि पुस्तकाचा उल्लेख खोटा आहे. फिर्यादीने या भाषणातील मजकूर हा खोटा आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींनी भाषणात उल्लेख केेलेले पुस्तक न्यायालयाने उपलब्ध करून द्यावे अशीही सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे. हे संपूर्ण प्रकरण आता पुणे न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी राहुल गांधींना प्रत्यक्ष या केस साठी हजर रहाण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एवढी सुट त्यांना देणे हे कायदेशीर असल्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. हे प्रकरण कायम चर्चेच असते.
कोण आहेत सात्यकी सावरकर ?
सात्यकी सावरकर हे स्वा.वि.दा.सावरकर यांचे भाचे अशोक सावरकर अशोक सावरकर यांचे पुत्र आहेत. त्यांनीच राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला आहे.
या प्रकरणाविषयी कोर्टाने काय म्हटले आहे ?
न्यायालयाने या प्रकरणाविषयी स्पष्ट केले आहे की, ही केस राहुल गांधींनी केलेल्या भाषणातील मजकूराविषयी आहे. फिर्यादीच्या कुटुंबाविषयी या केसचा काहीही संबंध नाही. फिर्यादीच्या मातृपक्षाची वंशावळ जाणून घेणे या प्रकरणात महत्त्वाचे नाही.
राहुल गांधींचा जामीन आबाधित
या प्रकरणातील फिर्यादीने असे म्हटले आहे की, राहुल गांधी मुद्दाम आपली बाजू मांडण्यास उशीर करत आहेत. हे प्रकरण ते टाळत आहेत. म्हणून त्यांचा जामिन रद्द करावा अशी मागणी केली गेली. त्यावर कोर्टाने राहुल गांधींकडून जाणूनबुजून कोणताही विलंब होत नसल्याने, त्यांचा जामिन रद्द करणे करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
Leave a Reply