भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात घसरण ( Gold Rate Decreased ) होताना दिसत आहे.
दिल्ली : 2025-05-07
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढलेला आहे. या तणावाचा परिणाम म्हणून आणि अमेरीकी फेडरल रिजर्व च्या मल्टी कमोडीटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण (Gold Rate Decreased ) पहायला मिळाली. MCX वर सोन्याचा दर 96 हजार 900 रुपये प्रति 10 ग्राम असा होता. मागच्यावेळी हा दर 97 हजार 491 रुपये प्रति 10 ग्राम इतका होता. हा दर रुपये 841 इतका म्हणजे 0.86 टक्के इतका घसरला. मागच्याकाही दिवसात सोन्याचे किंमतीमध्ये 3 % नी तेजी आली होती.
चांदीच्या किंमतीतही घसरण
MCX वर चांदीचे दरही घसरले आहेत. 251 रुपयाने म्हणजे 0.26 % इतक्या प्रमाणात ही घसरण झाली आहे. 96 हजार 450 रुपये प्रति किलोग्रॅम वर चांदीच्या किंमती आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा राजकिय तणाव वाढत चालला आहे. भारतीय सशस्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त कश्मिरवर आणि आंतकवाद्यांच्या क्षेत्रात मोठा हल्ला करत ऑपरेशन सिंदूर पार पाडले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून सोन्या चांदीचा ही घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
रुपयातही घसरण
मंगळवारी भारताने पाकव्यप्त कश्मिर मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याने भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान बुधवारी दिवसाच्या सुरूवातीला रुपयाच्या दरात घसरण बघायला मिळाली. रुपयाचा दर प्रति रुपया 31 पैसेने घसरला. रुपयाचा दर 84.66 प्रति डॉलर झाला आहे.
Leave a Reply