महाराष्ट्र : 2025-05-04
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल (Maharashtra HSC Result 2025 )उद्या सकाळी म्हणजे 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पहाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल mahresult.nic.in वेबसाईटवर पहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्याकडून इयत्ता बारावीच्या परिक्षा फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यांचा निकाल उद्या दुपारी लागणार आहे. मंडळाने तशी अधिकृत घोषणा आज केली. बारावीचा टप्पा हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सहसा या निकालावरून विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा ठरवली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिक्षा दिली आहे, त्यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे.
यावर्षी राज्यभरातून सुमारे 15 लाख विद्यार्थी या परिक्षेस पात्र ठरले होते. या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेद्वारे संपूर्ण बारावीचा निकास, तसेच विविध विभागांनुसार निकालाची आकडेवारी आणि वैशिष्ट्ये जाहीर करण्यात येतील. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून पुढे प्रत्येकाला त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पहाता येणार आहे. त्यासाठी mahresult.nic.in या वेबसाईटचा समावेश आहे.
निकाल कसा पहाल ?
मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन त्यावर क्लिक करा. त्याच्या होमपेजवर जाऊन महाराष्ट्र एसएससी/एसएससी निका २०२५ असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यापुढील दिसणाऱ्या योग्य विंडोवर जाऊन तुमचा परिक्षेचा आसन क्रमांक टाका. सोबत तुमच्या आईचे नाव टाकून सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल मिळेल. स्क्रिनवर दिसणाऱ्या तुमच्या निकालाची तुम्ही प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंटसुद्धा लागलीच काढू शकता. हे सर्व करण्यासाठी पुढीलपैकी एका वेेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.
निकाल पहाण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण वेबसाईट
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
Leave a Reply