पुणे : 04/21/2025
कर्नाटक कलबुर्गी येथील एसआरएन मेहता स्कूलच्या प्रकल्पास जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. नासा व एनएसएस गेरार्ड ओ नील स्पेस सेटलमेंट कॉंटेस्ट 2025 ही स्पर्धा नॅशनल स्पेस सोसायटी(NSS) आणि नासा एम्स रिसर्च सेंटर यांनी आयोजित केली होती.
या स्पर्धेत 25 देशांतील 26000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 4900 प्रकल्प(प्रोजेक्ट) सादर केले होते. या एसआरएन मेहता स्कूलचे मुख्याध्यापक राजा शेखर रेड्डी व बनशंकरय्या यांनी श्री चकोर मेहता आणि प्रीतम मेहता यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या यशा बद्दल विद्यार्थी व व्यवस्थापन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply