महाराष्ट्र : 2025-05-10
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. यावर्षीपासून इयत्ता 11 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केेंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी भरवण्यात यावी लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे.
सर्व विद्यार्थ्यांकडून हे शुल्क 100n रुपये इतके आकारण्यात येणार असल्याचे समजते. आत्तापर्यंत हे शुल्क मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी वेगळे आणि महाराष्ट्रातील इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगळे असे आकारण्यात येत असे. जुन्या प्रवेश शुल्काच्या किंंमती मुंबई साठी 225 रुपये आणि इतर भागातील विद्यार्थ्यासाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत असे. मात्र आता ते सर्वांसाठी एकच 100 रुपये इतके असणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिेयेसाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावरून 15 मे पर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे. 19 मे पासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे, त्यासाठी निर्माण करण्यात आलेेले संकेतस्थळ आहे – https://mahafyjcadmissions.in
या संकेतस्थळावरून करण्यात येँणारे कामकाज 9 मे पासून होणार आहे. दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहिर होईल असा अंदाज आहे. महाविद्यालयांनी 15 मे पूर्वी नोंदणी करून त्याचे प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर 19 मे ते 28 मे या कालावधित विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित आहे, त्यानुसार प्राधन्यक्रम ठरवण्यात येणार आहे.
अकरावीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
यंदा 11 वी साठी 16 लाख 76 हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी अकरावीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असणार आहे. मागच्या काही वर्षांपासून दिवाळीपर्यंत या प्रवेश प्रक्रियेचे कामकाज चालते, मात्र यावर्षी ते ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 11 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या 16 लाख 76 हजार जागा उपलब्ध होणार आहेत.
Leave a Reply