“Narmada Parikrama route” along with Mesmerizing 4 special tourist destinations – Madhya Pradesh

Narmada Parikrama Route
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

नर्मदा परिक्रमा मार्गातील मंत्रमुग्ध करणारे ४ पर्यटन स्थळं – मध्य प्रदेश

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama route) करण्यासाठी भाविकांची जेवढी गर्दी असते तेवढ्याच प्रमाणात इतर परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. या राज्यात भोपाळ, देवास, ग्वाल्हेर, हरदा, इंदौर, जबलपूर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर आदी ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे ते म्हणजे ‘नेमावर’.

नेमावर येथे नर्मदा नदीचे नाभी स्थान आहे. या स्थानावर परिक्रमा (Narmada Parikrama route) करताना जाता येत नाही. त्यामुळे अनेक जण परिक्रमा पूर्ण झाल्यानंतरच येथे येतात. नावेतून या नाभीस्थानावर पोहोचता येते. अथांग पाणी आणि नदीच्या मधोमध असलेल्या या स्थानावर नर्मदा मय्याची छोटी मूर्ती आहे. ज्यावेळेस नदीचा प्रवाह कमी असतो तेव्हाच येथे जाता येते.

Narmada Parikrama route

नर्मदा नदीविषयी थोडेसे –

नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी.) महाराष्ट्र (७२ -७४ कि.मी.) गुजरात (१६० कि.मी) या राज्यातून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम विहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रूद्रकन्या अशीही नावे आहेत. अगस्ती ऋषींनी काशी सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर नर्मदा नदी (Narmada Parikrama route) ओलांडून ते दक्षिणेतच स्थायिक झाले. नर्मदा ओलांडणारे व आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशातच आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरूवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते.


मध्य प्रदेशात पर्यटन करताना मराठी कुटुंबियांना कोणतीच अडचण येत नाही. एक तर येथे हिंदी भाषा प्रचलित आहे आणि तेथे अनेक मराठी भाषिक कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मध्यप्रदेशची (Madhyapradesh ) ट्रिप आपण स्वतः प्लॅन करु शकतो. ट्रेन, विमानाच्या माध्यमातून प्रवास आणि आंतरराज्यीय प्रवासासाठी स्थानिक ट्रान्सपोर्टचा वापर करता येतो.

Narmada Parikrama route

हरदा शहराविषयी –

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या हरदा शहरात वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे, संतांचे मठ आहेत. तर येथील राम मंदिरात श्रीराम राज्याभिषेकाची मूर्ती विराजमान आहे. हे शहर नर्मदा परिक्रमेच्या मार्गातील (Narmada Parikrama route) एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मूर्तीत श्रीरामाच्या मांडीवर सीता विराजमान असून मागे भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण उभे आहेत. तर हनुमान श्रीराम यांच्या चरणापाशी विराजमान असलेली मूर्ती भाविकांना आकर्षित करते.

Narmada parikrama route

नेमावर शहराविषयी –

नर्मदा नदीच्या तिरावर (Narmada Parikrama route) वसलेल्या सिद्धनाथ महादेवाच्या पावन स्पर्शाने पूनीत झालेली आहे नेमावर नगरी. इंदौर शहरापासून १३० किमी अंतरावर दक्षिण पूर्व दिशेला असलेल्या हरदा रेल्वे स्थानकापासून २२ किमी अंतरावर आहे नेमावर शहर. थोडक्यात हरदा पासून नेमावर हे अर्धा तासाच्या अंतरावर आहे. महाभारताच्या काळात नाभिपूर या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आता हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून प्रचिलित आहे. राज्य शासनाच्या गॅझेटमध्ये नाभापट्ट्म या नावाने या शहराची नोंद आहे. याच शहरामधे नर्मदा नदीचे नाभी स्थान आहे. येथे नदीकिनारी अतिशय भव्य आणि सुबक कलाकुसर असलेले महादेवाचे मंदिर आहे. हिरवाईने नटलेला परिसर आणि येथील घाट लक्षवेधी आहेत. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे वाहतुकीपेक्षा पादचारी आणि रस्त्यावर विहार करणाऱ्या प्राण्यांना प्रथम स्थान दिले जाते.

मध्य प्रदेशातील (Madhyapradesh ) ग्रामीण भागात आजही शेती हाच व्यवसाय अग्रस्थानी आहे. विविध ठिकाणी विकासही झाल्याचे दिसून येते. येथे असलेल्या नवघाटखेडी या गावात महासिद्ध वटवृक्ष प्रसिद्ध आहे. या वटवृक्षाच्या हजार पारंब्या जमिनीत रुजल्या आहेत, त्यामुळे त्याला महासिध्द वटवृक्ष असे संबोधले जाते. अतिशय भव्य असलेल्या वटवृक्षाच्या छायेत आल्यावर शांत वाटते. या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालता येते.

Narmada parikrama route

देवास विषयी –

मध्य प्रदेशात (Madhyapradesh ) विकसित झालेले शहर म्हणून देवासचा उल्लेख केला जातो. हे शहर इंदौर पासून सुमारे ३५ किलोमीटर जवळ आहे. देवास शहरातील टेकडीवर तुळजाभवानी आणि चामुंडा देवीचे मंदिर आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. हिरवाईने नटलेल्या या परिसरात भाविकांना चालण्याचा त्रास नको म्हणून रज्जूरथाची सोय केली आहे. परंतु अनेक भाविक निसर्गाचा आस्वाद घेत पायीच दर्शनाचा आनंद घेतात. आधी तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे, त्याचे दर्शन घेतल्यानंतर चामुंडा देवीच्या दर्शनाला जावे लागते. त्यामुळे या टेकडीला प्रदक्षिणा घातली जाते. या मार्गावर (Narmada Parikrama route) वेगवेगळ्या प्रकारची शिल्पे आढळून येतात तर येथून दिसणारे हेलिपॅड सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Narmada Parikrama route
Narmada parikrama route
Narmada parikrama route

देवासपासून पुढे इंदौर (Indaur) शहर आहे. येथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे. महेश्वर सिल्कच्या साड्या, विविध प्रकारच्या बांगड्यांनीही बाजारपेठ सजलेली असते. तर खवय्यांसाठी विविध प्रकारचे खाद्य पदार्थही येथे उपलब्ध आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराजांचे गोंदवले धाम इंदौर येथे साकारले आहे. येथे अनेक भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनला भाविकांची कायम गर्दी असते. महाकालाचे दर्शन आणि भस्मारतीसाठी खूप लांबून भाविक येत असतात. एकंदरीतच मध्यप्रदेशाची (Narmada Parikrama route) सहल करताना निसर्गाबरोबरच धार्मिक स्थळेही पदोपदी आढळतात.

Narmada parikrama route

तनिष्का डोंगरे.

2 thoughts on ““Narmada Parikrama route” along with Mesmerizing 4 special tourist destinations – Madhya Pradesh”

  1. तनिष्का बेटी, या समुहावर प्रथमच आपल्याला पाहतोय. कारण आज वर्षभर मी ज्योती भालेराव यांचे लेख वाचत आलोय. Miscellaneous Bharat या समुहाने खूप सुंदर प्रेक्षणीय स्थळांबद्दल महत्व पूर्ण माहीती आम्हा वाचकांपर्यंत पोहोचविली आहे. त्या बद्दल अनेक धन्यवाद.
    नर्मदा मैया वरील हा लेख विलक्षण मोहक झालाय. पर्यटन माहीती सोबत प्रत्येक स्थानाचे स्थान- महात्म्य आपण संक्षिप्त परंतु मुद्देसूद मांडले आहे.
    ही माहीती सचित्र असल्यामुळे चक्षुं द्वारे हृदयापर्यंत सहज पोहोचते आणि स्मरणात राहाते.
    खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद.
    आनंद ग. मयेकर
    ठाणे

    Reply
  2. नर्मदा परिक्रमाबद्दल खूपच माहितीपूर्ण लेख असून परिक्रमेतील स्थळांची चित्तावेधक माहिती सचित्र दिली आहे. धन्यवाद!

    Reply

Leave a Reply