Indian Railways Waiting List Rule: नियमित ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटांनंतर आणखी एका महत्त्वाच्या तिकिट प्रक्रियेबाबत बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे.
राष्ट्रीय : 2025-06-22
गेल्या काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीकडून तात्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलानंतर भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टच्या तिकिटांबाबत मोठा बदल केला आहे. आता रेल्वेकडून प्रत्येक ट्रेनच्या कॅटेगरी (AC1,2, आणि 3 स्लीपर आणि चेअर कार) मध्ये एकूण सीटमध्ये फक्त 25 टक्केपर्यंतच वेटिंग तिकीट लागू केले जातील. वेटिंग तिकीट लागू केल्यानंतर दिव्यांगांचा कोटा आणि वेगवेगळ्या कॅटगरीमधील सीट या कोट्यामध्ये असणार. रेल्वेचे हे पाऊल म्हणजे प्रवाशाना कन्फर्म तिकिट मिळावे आणि अनिश्चितता दूर व्हावी यासाठी आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, साधारणपणे 20%-25% प्रतीक्षा यादीतील तिकिटे प्रवासापूर्वीच निश्चित होतात. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या परिपत्रकानंतर, सर्व झोनल रेल्वेने या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी, प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या जास्त असल्याने, बरेच प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये चढत असत, ज्यामुळे गाड्यांमध्ये गर्दी वाढत असे. यामुळे तिकिट निश्चित असलेल्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. तिकीट विकत घेतल्यानंतर लोकांना येणारी अनिश्चितता कमी करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
काय आहे आधीचा नियम ?
जानेवारी 2013च्या नियनांनुसार, AC1मध्ये 30, AC1मध्ये 100, AC3मध्ये 300 आणि स्लीपरमध्ये 400 वेटलिस्टपर्यंत तिकीट लागू केले जातात. आता, नवीन धोरणानुसार, प्रत्येक झोनल रेल्वे बुकिंग आणि रद्द करण्याच्या पद्धतीनुसार प्रतीक्षा यादीतील तिकिटांची मर्यादा ठरवेल. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी, प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या जास्त असल्याने, कन्फर्म तिकिटांची संख्या आणि ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फरक असायचा. त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. नवीन नियमांमुळे प्रवाशांना चांगला अनुभव घेता येईल.
‘उपलब्ध सीट’ म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला, परदेशी पर्यटक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र कोटा वाटून सामान्य बुकिंगसाठी सोडलेल्या जागा. उदाहरणार्थ, सर्व कोटा लागू केल्यानंतर जर 400 बर्थ बुकिंगसाठी उपलब्ध असतील, तर प्रतीक्षा यादीत जास्तीत जास्त 100 जागा सोडल्या जाऊ शकतात. सध्या, प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या जास्त असल्याने, गर्दीच्या हंगामात जास्त त्रास होत असे. विशेषतः दिवाळी आणि छटच्या निमित्ताने खूप गोंधळ असायचा. नवीन नियमांनुसार, प्रत्येक कोचमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण बर्थच्या फक्त 25% जागांसाठी प्रतीक्षा यादी लागू केली जाईल.
Leave a Reply