Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात हा अत्यंत दुदैर्वी होता, ही घटना अत्यंत भयावह आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. याविषयी संसदेत मी मुद्दे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : 2025-06-14
अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी ( Ahmedabad Plane Crash )बोलताना खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule )यांनी म्हटले आहे की, ही दुर्घटना खुप भयावह आहे. याविषयी मी संसदमध्ये चर्चा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अपघातस्थळाला भेट दिली. त्यासाठी मी त्यांचे कौतुक करते. भारतासाठी हे 24 तास खुप कठिण राहिले आहे. अपघाताविषयी बोलतानाच, त्यांनी रस्ते, रेल्वे आणि हवाई अशा सर्व स्तरातील वाहतूकीविषयी चिंता व्यक्त केली आहे.
नितिन गडकरी यांची रस्ता वाहतुक सुरक्षिततेला प्राथमिकता
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना धन्यवाद देते, कारण त्यांनी सर्व लोकप्रतिनीधींना खुलेपणाने सुरक्षेला जास्त प्रधान्य द्या असे सांगितले आहे. रस्ते सुरक्षा हा त्यांचा कायम प्राधान्यक्रम आहे. आम्ही सगळ्यांनीच पायाभूत सुविधा आणि सुरक्षेत सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत रेल्वे वापरणाऱ्यांची संख्या जास्त
मुंबई रेल्वे वापरण्याऱ्यांची संख्या खुप जास्त आहे. मी अश्विनी वैष्णव हीला भेटायला जात आहे. भारत सरकारला अजून बरेच प्रयत्न करून रेल्वे सुरक्षेत आणखी सुधारणा करण्याची आश्यकता आहे. सिव्हिल एविएशन चा सर्वात जास्त धोका आहे. बऱ्याच काळापासून हे सर्व धोक्याचा इशारा देत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अहमदाबादची घटना खुप वेदनादायी
खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदाबाद अपघात घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले . मी अमित शहा आणि पंतप्रधान यांचे कौतुक करते, ते अपघात स्थळी गेले. संपूर्ण देश आणि जगभरातून मदत केली जात आहे. भारतासाठी ते 24 तास खुप कठिण होते. आपण सर्व खुपच दुःखी आहोत. विजय रुपाणी आमच्यासाठी एक अद्भूत सहकारी होते, अशा शब्दात त्यांनी अहमदाबाद अपघाताविषयी शोक व्यक्त केला.
Leave a Reply