Translate :

Sponsored

11th Class Admission, Good News, 2026 : अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना अंतिम संधी, अंतिम विशेष फेरीला आजपासून सुरूवात : Final Special Round For class 11 Admissions Begins Today

अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना अंतिम संधी, अंतिम विशेष फेरीला आजपासून सुरूवात ( फोटो-सोशलमीडिया)

11th Student Admission : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 15 लाख 45 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 13 लाख 26 हजार 397 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

पुणे : 13-08-2026

राज्यातील अकरावी प्रवेश (11th Class Admission) शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील केंद्रीय ऑनालाईन प्रेवश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम विशेष फेरी जाहीर कऱण्यात आली आहे. नियमित तीन आणि विशेष पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी मिळणार आहे. अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया 12 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी दिली.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 15 लाख 45 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 13 लाख 26 हजार 397 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. व्यवस्थापन,संस्था अंतर्गत आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठी ही स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षण संचालकांनी सांगितले.

अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक (11th Class Admission)

नोंदणी, अर्ज भरणे, दुरूस्ती व पसंतीक्रम 12 ऑगस्ट सकाळी 10 ते 16 ऑगस्ट सायं.6

अलॉटमेंट प्रक्रिया 17 ऑगस्ट

वाटप यादी प्रसिद्ध 18 ऑगस्ट सकाळी 10

प्रवेश निश्चिती 18 ऑगस्ट सकाळी 11 ते 20 ऑगस्ट सायं. 6

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored