Translate :

Sponsored

Tukaram Mundhe Warning, Big News, 2026 : ‘अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही ; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा : No compromise On Food Adulteration Tukaram Mundhe Issues A Stern Warning

'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही ; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा .

Tukaram Mundhe Warning : नुकताच आयुक्त तुकाराम मुंढेंकडून सर्व अन्नाशी निगडित विक्रेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. कोणताही सण असो वा कार्यक्रम अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही. एफडीएकडे गेल्या तीन महिन्यांत सुमारे 16 हजाक तक्रारी प्राप्त झाल्या असून, जुलैअखेरपर्यंत तीन हजारांहून अधिक खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. कारवाईत 165 परवाने निलंबित, तर 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या.

मुंबई : 27-08-2026

अन्नाच्या गुणवत्तेला जात, धर्म, व्यवसाय किंवा ठिकाणाची (Tukaram Mundhe Warning) सीमा नसते. त्यामुळे गणेशोत्सवातील महाप्रसाद असो, रस्त्यांवरील खाद्यपदार्थ असो किंवा पंचातारांकित हॉटेलमधील जेवण, अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत. अन्नातील भेसळीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्याक्रमात मुंढे यांनी अन्न व सुरक्षा, खाद्यतेल, रेस्टॉरंट, शाळांमधील खाद्यपदार्थ, औषध विक्री, रक्तपेढ्या आणि सणासुदीतील खाद्य व्यवसायांबाबत एफडीएची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी नसल्याचे सांगताना हा निर्णय कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य कऱण्यासाठी घेतलेला नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

2011 पासून यासंदर्भात नियम असून महाराष्ट्राला देण्यात आलेली सवलत 2020 नंतर वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्रांच्या नियमांनुसार सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन महिन्यातील तक्रारींचा आकडा (Tukaram Mundhe Warning)

एफडीएकडे गेल्या तीन महिन्यांत सुमारे 16 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, जुलैअखेरपर्यंत तीन हजारांहून अधिक खाद्य व्यवसायांची तपासणी कऱण्यात आली. कारवाईत 165 परवाने निलंबित, तर 750 हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. त्रुटी दूर केल्यानंतर पुनर्तपासणी करून नियमांचे पालन झाल्यास निलंबन उठवले जाते, अन्यथा परवाना रद्द कऱण्याची कारवाईही होण्याची शक्यता असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

रेस्टॉरंटसकडून नियमांचे पालन (Tukaram Mundhe Warning)

रेस्टॉरंटसकडून स्वतःहून सुधारणा आणि किचनचे नूतणीकरण केले जात आहे. काही रेस्टॉरंटसनी ठराविक कालावधीनंतर स्वतःहून किचन बंद ठेवून स्वच्छता आणि सुधारणा कऱण्याचा निर्णय घेतला आहे.

फीडबॅक यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. (Tukaram Mundhe Warning)

खाद्य आस्थापनांमध्ये झुरळं आढळ्यानंतर काही व्यावसायिकांकडून विचित्र कारणे दिली जातात. मात्र, कारणांपेक्षा प्रत्यक्ष पुरावे आणि नियमांचे पालन महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. खाद्यपदार्थांचे रंग आणि दुधाच्या चवीत बदल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रतिक्रियांसाठी भविष्यात औपचारिक फिडबॅक यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. एफडीएचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही,’ असेही आयुक्त मुंढे (Tukaram Mundhe Warning) यांनी स्पष्ट केले.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored