Translate :

Sponsored

FDA Raid On Domino’s, Big News, 2026 : FDA ची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेड-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आऊटलेटसचे परवाने निलंबित

FDA ची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेड-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आऊटलेटसचे परवाने निलंबित .

FDA Raid On Domino’s : एफडीएने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. तब्बल 104 ठिकाणी छापेमारी केली आहे. अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटीमुळे विर्लेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील डॉमिनोजचे लायसन्स निलंबित कऱण्यात आले आहेत.

मुंबई : 12-08-2026 

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मुंबईतील बड्या फूड जॉइंटसवर  (FDA Raid On Domino’s)  धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे आणि मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील ‘डॉमिनोज पिझ्झाच्या’तीन प्रमुख आऊटलेटसचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या पथकाने 11 ऑगस्ट रोडी मुंबईतील मॅकडोनाल्डस, बर्गर किंग आणि डॉमिनोजसारख्या एकूण 104 खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकून ही कारवाई केली.

यावेळी व्हेज आणि ऩॉनव्हेज पिझ्झा तयार करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म, टेबल, एकच ओव्हन वापरण्यात येत असल्याचं दिसून आलं. त्याचसोबत त्यासाठी वापरण्यात येणारं तेल हे एक्सपायर झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे एफडीएने डॉमिनोज पिझ्झाचे तीन आऊटलेटस सील केले.

कोणत्या 3 डॉमिनोज आऊटलेटसवर कारवाई  (FDA Raid On Domino’s )

ज्युबिलंट फूडवर्क्स लि.अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पुढील तीन ड़ॉमिनोज आऊटलेटसचे परवाने एफडीएने निलंबित केले आहेत.

  • विर्लेपाले (पश्चिम) : एस.व्ही.रोड आणि डी.जे.रोडच्या कोपऱ्यावरील आऊटलेट
  • बोरिवली (पश्चिम) : आय.सी.कॉलनी, सेंट फ्रान्सिस स्कूल ग्राऊंडसमोर, ‘ द कॅसल’ इमारतीतील आऊटलेट.
  • घाटकोपर (पश्चिम) : आर-सिटी मॉल (R-City Mall) तिसरा मजला, ए-विंग आऊटलेट

एफडीएच्या तपासणीत काय आढळले ( FDA Raid On Domino’s )

अन्न सुरक्षा व मानके विनियम, 2011 च्या परिशिष्ट -4 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकऱणी ही कारवाई कऱण्यात आली आहे.

अस्वच्छता अन किटकांचा प्रादुर्भाव  (FDA Raid On Domino’s )

किचन आणि फूड प्रिपरेशन एरियामध्ये प्रचंड अस्वच्छता, तेलकटपणा, उंदरांचा आणि किटकांचा वावर आढळला.

तापमान नियंत्रणाचा अभाव : फ्रोझन फूड आणि पिझ्झा साहित्याची योग्य तापमानावर साठवणूक व टेंपरेचर मॉनिटरिंग’ नसणे.

कच्चा -शिजवलेला माल एकत्र ( FDA Raid On Domino’s )

कच्चे शिजवलेले अन्न आणि शाकाहारी-मांसाहारी घटकांचे योग्य विलगीकरण न करणे. तसेच FIFO/FEFO नियमांचे पालन न करणे.

वैद्यकीय तपासणी अन कागदपत्रांचा अभाव :  (FDA Raid On Domino’s)

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण, ग्लोव्हज/ॲप्रनचा वापर न करणे. तसेच पाण्याचे चाचणी अहवाल व फूड ग्रेड प्रमाणपत्रे नसणे.

इम्प्रोव्हमेंट नोटीसमधील सर्व त्रुचींची पूर्तता करून एफडीएची पुन्हा मंजुरी मिेळेपर्यंत या तीन्ही आऊटलेटसना विक्री अथवा उत्पादन करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored