Translate :

Sponsored

Tukaram Mundhe FDA, Big News, 2026 : मुंढेंची पुन्हा कडक कारवाई, दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका : Milk Collection Declines By 20 Lakh Liters

मुंढेंची पुन्हा कडक कारवाई, दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका.

Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या कुठेनाकुठे दररोज कारवाई सुरू आहे. जेव्हापासून प्रशासकिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या विभागाचा पदभार घेतला आहे, तेव्हापासून दूध विक्रेते आणि हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात सरासरी दररोज 1.80 कोटी 2 लिटर दूध संकलित होते. मे 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार, दुग्ध आयुक्त कार्यालयाकडे 1 कोटी 79 लाख 22 हजार लिटर दूध संकलनाची नोंद आहे.

मुंबई : 10-07-2026

राज्यात सध्या दररोज सुमारे पावणेदोन कोटी लिटर दूध संकलित केले जाते. गतवर्षीच्या तुलनेत यात जवळपास 20 लाख लिटरची (Tukaram Mundhe FDA) घट झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे ही घट झाल्याचा दावा उत्पादकांकडून केला जात आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून, ते प्रतिलिटर 40 रुपयांपुढे गेले आहेत.

राज्यात दूध संकलन कऱणाऱ्या गुजरातमधील अमूलच्या संलग्न जिल्हा दूध संघांनी हे दर जाहीर केले आहे. राज्यात गुजरातमधील सहकारी दूध संघांनी प्रमाणित गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 41 रुपये दर जाहीर केला आहे. यापूर्वी हा दर प्रतिलिटर 40 रुपये  होता. मात्र, राज्यातील स्थानिक खासगी संस्था अद्याप गायीच्या दुधाला प्रतिलिटर 38 ते 39 रुपये दर लावत आहेत. म्हशीच्या दुधाच्या संकलनातही मोठी घट झाली आहे. गुजरातमधील सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असली, तरी राज्यातील स्थानिक खासगी संस्था अद्याप कमी दराने दूध खरेदी करत आहेत.

राज्यातील दैनंदिन संकलन 1.80 कोटी लिटर (Tukaram Mundhe FDA)

महाराष्ट्रात सरासरी दररोज 1.80 कोटी 2 लिटर दूध संकलित होते. मे 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार, दुग्ध आयुक्त कार्यालयाकडे 1 कोटी 79 लाख 22 हजार लिटर दूध संकलनाची नोंद आहे.

सोलापूरात एफडीएची धडाकोबाज कारवाई (Tukaram Mundhe FDA)

दूध भेसळविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका आता थेट सोलापूर जिल्ह्यातील बसला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे राज्यातील गाजलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका आता थेट सोलापूर जिल्ह्यातील बसला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे राज्यातील गाजलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुंढे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूजपर्यंत पोहोचलेल्या या साखळीवर दुसरा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत आणखी एक मोठे रॅकेट उद्धवस्त केले आहे.

1.35 कोटींचा साठा जप्त (Tukaram Mundhe FDA)

अकलूज येथील गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 96 हजार 780 किलो संशयित पावडर जप्त कऱण्यात आली. या साठ्याची किंंमत 1 कोटी 35 लाख 46 हजार 81 रुपये इतकी आहे. याशिवाय सोनू घोरपडे  यांच्या गोदामातून 51 किलो मिल्क पावडर जप्त कऱण्यात आली असून तिची किंमत 7 हजार 171 रुपये आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored