Translate :

Sponsored

Pune Water News, Important News, 2026 : पुण्यातील बहुतांश भागांत गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी :

पुण्यातील बहुतांश भागांत गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

Pune Water News : पुण्यात गुरूवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रुंगी, होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगा -राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे.

पुणे : 25-08-2026

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत (Pune Water News)  विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्य विषयक तातडीची देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरूवारी (दिनांक 27 ) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दिनांक 28 ) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठी करून ठेवण्याचे आवाहन (Pune Water News)

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी 27 ऑगस्टपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. पर्वती एचएलआर टाकी परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कोंढवा खूर्द, अप्पर व लोअर इंदिरानंगर, गंगाधाम, महर्षीनगर, पर्वती गावठाण आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भामा आसखेड जलकेद्रांतर्गत लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि खराडी परिसर प्रभावित होणार आहे.

कोणकोणत्या भागात होणार नाही पाणीपुरवठा ? (Pune Water News)

एसएनडीटी एचएलआर परिसरातील औंध, बोपोडी, गोखलेनगर, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रोड, प्रभात रोज, पौड रोड, कर्वे रोड, वारजे आदी भागांमध्येही पाणीपुरवठा बंदचा परिणाम भोगावा लागणार आहे. चांदणी चौक टाकीअंतर्गत बावधन, पाषणा,सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस रोड परिसराचा समावेश आहे.

याशिवाय, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रुंगी,होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगाव-राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored