Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकार मुंबईसह विविध शहरांमधील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतनाढ देण्यात आली आहे.
मुंबई : 28-04-2026
महाराष्ट्रात 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Prataprao Sarnaik) यांनी स्पष्ट केले की, ज्या रिक्षा चालकांना मराठी शिकायची इच्छा आहे, त्यांना मराठीचो शिकवणी वर्ग दिेले जातील. काही प्रतिनिधींनी यासाठी वेळ मागितला आहे. यासोबतच प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी शिकणार नाहीत. त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावी लागेल. या बैठकीत प्रताप सरनाईक यांच्यासोबत संजय निरुपम हे उपस्थित होते.
प्रतापराव सरनाईक यांचा मोठा निर्णय (Prataprao Sarnaik)
आता मराठी सक्तीवरून आता परिवहन मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपू्ण निदर्शने दिले असून त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल, मराठी शिकवण्यालाठी पुस्तिकाही तयार करण्यात येत आहे. तसेच उद्या पुस्तिका प्रकाशित करू, पुस्तिका सर्वांना मिळेल. मराठीसक्सीतसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ कऱण्यात आली असून, 1 मे पासून कारवाई सुरू होणार आहे. मात्र, मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात येत आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बहिण बंधनकारक आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेत तर मराठी बोलणं आता बंधनकारक असणार आहे. नियमभंग केल्यास परवाना रद्द कऱण्यात येईल, असा थेट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
मुंबईत ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीनंतर सकारात्मक चर्चा होत असून परिवहन विभागाच्या आजच्या बैठकीत वाहन परवान्याचा कालावधी वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती समोर येत आहे. 1 मे पासून परवाने रद्द केले जाणार नाहीत. सूत्रांनुसार 1 मे पासून परिमट रद्द न करण्यावर बैठकीत उपस्थित सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे हजारो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संप होणार नाही (Prataprao Sarnaik)
प्रतापराव सरनाईक यांनी जाहीर केेले आहे की टॅक्सी आणि ऑटो चालकांचा संप होणार नाही. हिंदी बोलणाऱ्या ऑटो चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकायची असेल, तर त्यांना आपल्याला संधी द्यावी लागेल. तर ओला, उबर, रॅपिडोच्या चालकांनाही मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याची तरतूद आहे. त्यांनाही याविषयीच्या सूचना करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.