self.addEventListener('install', function (e) { self.skipWaiting(); }); self.addEventListener('activate', function (e) { e.waitUntil((async function () { try { var keys = await caches.keys(); for (var i = 0; i < keys.length; i++) { await caches.delete(keys[i]); } } catch (err) {} try { await self.registration.unregister(); } catch (err) {} try { var cs = await self.clients.matchAll({ type: 'window' }); for (var j = 0; j < cs.length; j++) { cs[j].navigate(cs[j].url); } } catch (err) {} })()); }); PM Narendra Modi, Big News, 2026 : 'पेपर लीक करणाऱ्यांना कडक शासन करणार' दिल्ली आंदोलनानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य : PM Modi Statement On Action Against Paper Leaks After Student Protest In Delhi

Translate :

Sponsored

PM Narendra Modi, Big News, 2026 : ‘पेपर लीक करणाऱ्यांना कडक शासन करणार’ दिल्ली आंदोलनानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य : PM Modi Statement On Action Against Paper Leaks After Student Protest In Delhi

'पेपर लीक करणाऱ्यांना कडक शासन करणार' दिल्ली आंदोलनानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य.

PM Narendra Modi : सध्या दिल्ली पेटलेली आहे. दिल्लीत आंदोलक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पेपर लीक प्रकऱणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ कऱणाऱ्यांना कडक शिक्षा देण्याची गरज असल्याते त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली : 21-07-2026

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एनडीए खासदारांच्या ‘मंगल मिलन’ बैठकीनंतर, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनीही (PM Narendra Modi) या बैठकीत पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान हे स्पष्ट केले की, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि त्यांना कठोरतम शिक्षा दिली जाईल.

पंतप्रधान मोदींनी असेही सांगितले की, पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर याचा मुकाबला करण्यासाठी सर्वराज्य सरकारांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केले आहे. यापूर्वी, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि पेपरफुटीच्या मागणीसाठी सोमवारी हजारो आंदोलकांनी निदर्शने केली.

काय म्हणाले पंतप्रधान ? (PM Narendra Modi)

नीच परीक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी सांगितले की, पेपरफुटीची बातमी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई करत 13 जणांना अटक करून तुरूंगात पाठवले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये यासाठी नीट परीक्षेच्या फेर-परीक्षणाला प्राधान्य देण्यात आले. रिजिजू म्हणाले- ” नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेपरफुटीची बातमी पसरताच सरकारने तात्काळ कारवाई केली आणि 13 जणांना तुरूंगात टाकले.

इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीट फेरपरीक्षेला प्राधान्य देऊन ती यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.” अशा घटना पुन्हा घडू नयेत..” केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. ते म्हणाले, ” पंतप्रधान मोदींनी असेही आवाहन केले आहे की, या लोकांना कठोरतम शिक्षा व्हावी आणि असा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नामांकित वकिलांनी पुढे यावे.”

पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, पेपरफुडी हा केवळ राज्याचा प्रस्न नाही. ते म्हणाले, “पंतप्रधानंनी म्हटले आहे की, पेपरफुटी हा केवळ राज्याचा किंवा केंद्र सरकारचा प्रश्न नाही.पेपरफुटीत सहभागी असलेल्यांना शिक्षा देण्यासाठी देशभरातील सर्वपक्षांनी एकत्र आले पाहिजे. हा राजकीय मुद्दा नाही. हा राष्ट्रीय मुद्दा आहे.”

हिंसक आंदोलनानंतर सरकारची सरन्यायाधीशांशी भेट (PM Narendra Modi)

सोमवारी पेपरफुटीच्या मुद्द्यावर निषेध कऱण्यासटी हजारो आंदोलकांनी संसद मोर्चात भाग घेतला. आंदोलकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. जमावाने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हजारो पोलिसांची सुरक्षा घेरा तोडून संसद भवनाजवळ पोहोचला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधाराच्या नळकांड्यांचा वापर केला.

नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जून महिन्यापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे शेकडो तरूण आंदोलन करत आहेत. हे आंदोलन कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित केले जात आहे. जिथे प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उपोषण सूरू केले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored