Translate :

Sponsored

Pune Crime, Breaking News, 2026 : पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा ! वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केली हत्या ! : Pune Crime Murder On Pune Satara Highway Solved Son Avenges Fathers Killing After 23 Years

पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा ! वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केली हत्या !

Pune Crime : पुण्यातील शिंदेवाडी परिसरातील खुनप्रकऱणाचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. 2023 मध्ये वडिलांचा खून झाल्याचा बदला घेण्यासाठी 23 वर्षीय मंथन वैद्य तीन साथीदारांसह संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली. चौघांना अटक कऱण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीते पिस्तूूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त कऱण्यात आली आहेत.

पुणे : 21-07-2026 

पुणे येथे (Pune Crime) एक अशी हत्या घडली आहे, जीचे कारण ऐकूण सर्वजण अवाक झाले आहेत. जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. हा खून कोणत्याही वैयक्तिक वादातून नव्हे, तर तब्बल दोन वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचल्याचे तपासात समोर आले आहे. 23 वर्षीय तरूणाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी चौघांना अटक करत देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

काय हे हे खून प्रकऱण ? ( Pune Crime )

संजय बाबूराव कडू-देशमुख (वय 40, रा.मुंढवा, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ) मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कौरी (दोघे रा. पर्वती दर्शन) अशी आहे. 11 जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात देशमुख यांच्यावर धारधार शस्राने वार करून हत्या केली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलं आणि तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदिप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीते एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश यांचा 2023 मध्ये देशमुखने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored