Translate :

Sponsored

CJP Meeting Govt, Good News, 2026 : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का ? प्रश्न अनुत्तरीतच, CJP ची केंद्रासोबत भेट : Will Dharmendra Pradhan Resign Or Not ? Major Update About CJP And Government Meeting

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का ? प्रश्न अनुत्तरीतच, CJP ची केंद्रासोबत भेट .

CJP Meeting Govt : दिल्ली मध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJP आणि केंद्र शासनामध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यानुसार सरकार आणि सिजेपी यांच्यात चर्चा कऱण्यासाठी ठिकाण ठरवण्यात आले होते. सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकाने मान्य केली होती. त्यासाठी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाण निश्चित कऱण्यात आले होते. बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले.

दिल्ली : 24-07-2026स

सध्या देशात महत्त्वाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या (CJP Meeting Govt)  प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडलीय या बैठकीला सीजेपीच्यावतीने प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी प्रतिनिधीत्व केले.

सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी.ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाण निश्चित कऱण्यात आले होते. पण बैठकीच्या अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाणा बदलण्यात आले. कॉन्स्टिस्टूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणाऐवजी विठ्ठलभाई पटेल हॉल या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली.

बैठकीनंतर मिळालेल्या माहितीनुसार बैठकीदरम्यान, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा आग्रह सीजेपीच्या सदस्यांकडून कऱण्यात आला. पण दोन ते तीन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे. उद्या सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार आहे. उद्या दुपारपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार आहेत की नाही, याचे उत्तर आणखी गुलदस्त्यातच आहे.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही बैठक तब्बल 2 तास सुरू होती.

तीन प्रमुख मागण्या आणि पाच सुधारणांचे प्रस्ताव (CJP Meeting Govt)

बैठकीतील चर्चेबाबत माहिती देताना केंद्रीय मंंत्री म्हणाले की, ” सीजेपी नेत्यांसोबतची बैठक सुमारे 2 तास चालली. त्यांनी आमच्यासमोर 3 प्रमुख मागण्या आणि परिक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी 5 महत्त्वाच्या सूचना मांडल्या आहेत. आम्ही त्यांना आश्वस्त केले आहे की, या विषयांवर सरकारमध्ये चर्चा करून उद्या दुपारी आम्ही पुन्हा एकत्र भेटू आणि पुढील निर्णयाची माहिती देऊ.

उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष (CJP Meeting Govt)

जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सीजेपी नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्या दुपारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीतील सरकार काय भूमिका घेते आणि आंदोलनावर काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored