Translate :

Sponsored

Pralhad Joshi New Education Minister, Good News 2026 : नवे शिक्षणमंत्री पद आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे, एकुण तीन मंत्रालयाची सुत्रे सांभाळणार : Now New Education Minister is Pralhad Josh

वे शिक्षणमंत्री पद आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे, एकुण तीन मंत्रालयाची सुत्रे सांभाळणार.

Pralhad Joshi New Education Minister : CJP ने केलेल्या आंदोलनाला यश येऊन, अखेर काल धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. परीक्षा गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री पद त्यांना सो़डावे लागले होते. आता प्रल्हाद जोशींकडे हे पद सोपवण्यात आले आहे.

दिल्ली : 26-07-2026

गेले महिनाभर जंतर-मंतर येथे सीजेपीने केलेल्या आंदोलामुळे दिल्ली आणि एकुण राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. या सर्व घडामोडींमध्ये जेन झी आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांना मोठे यश आले आहे. परीक्षांमधील गैरव्यवहार आणि देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi New Education Minister) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

प्रल्हाद जोशींकडे तीन मंत्रालयांचा भार (Pralhad Joshi New Education Minister)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देशाच्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता तीन मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा (2004 ते 2024 ) विजयी झालेले प्रल्हाद जोशी हे केंद्र सरकारमधील अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेते मानला जातात. ते सध्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (ISA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यानंतर आता त्यांच्याकडे एकूण तीन महत्त्वाची मंत्रालये आली आहेत. ज्यामध्ये मंत्रालयाच्या अतिरिक्त कार्यभारासोबत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण  मंत्रालय आणि नवीन आणि नूतनीकरणीय उर्जा मंत्रालय यांचा समावेश आहे.

प्रल्हाद जोशी यांचा परिचय (Pralhad Joshi New Education Minister)

प्रल्हाद जोशी हे 27 नोव्हेंबर 1962 मध्ये कर्नाटकातील विजयपुरा (विजापूर) येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यंकटेश जोशी रेल्वेत सेवेत होते, तर आई मालतीबाई गृहीणी होत्या. अत्यंत साध्या,मध्यमवर्गीय वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांनी विद्यार्थीदशेतच राष्ट्रसेवा आणि सामाजिक विषयांची आवड निर्माण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी व्यवसायसोबतच सामाजिक उपक्रमांत स्वतःला गुंतवून घेतले आणि पुढे भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणाची सुरूवात केली.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored