Translate :

Sponsored

Pune Metro Extension , Big News, 2026 : पुणे मेट्रोच्या विस्तारिकरणाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन, मात्र खराडी आणि खडकवासला मार्गाचे काम सुरू होण्यास 6 महिन्यांची प्रतिक्षा : Pune Metro Extension Delay PMC Mahametro Dispute Tender Extension

Pune Metro Extension: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या आणखी चार विस्तारित मार्गांचे भूमिपूजन होत आहे. मात्र असे असले तरी, नळ स्टॉप ते माणिकबाग आणि खराडी ते खडकवासला या दोन मार्गांचे काम सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुणे : 03-11-2026 

महामेट्रोच्या अतंर्गत संपूर्ण पुणे शहरासाठी मेट्रोचे जाळे (Pune Metro Extension) निर्माण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मेट्रोच्या चार विस्तारित मार्गांपैकी दोन मार्गांची कामे सुरू होण्यास अजून विलंब होणार असल्याचे चित्र आहे. मेट्रोच्या खराडी ते खडकवासला मार्गांवरून जाणारा प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मार्गांवरील प्रस्तावित दोन उड्डाणपू याबाबत ‘महामेट्रो’ आणि पुणे महापालिकेचे एकमत नाही. महामेट्रो आणि महापालिकेच्या या समस्येमुळे या मार्गांचे काम सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतिक्षा अनिवार्य झाली आहे.

महामेट्रोला या दोन्ही मार्गांच्या उभारणीच्या निविदा सादर करण्यासाठी आणकी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी लागली आहे. म्हणजेच नळस्टॉप ते माणिकबाग आणि खराडी ते खडकवासला या दोन मार्गांचे काम सुरू होण्यास सहा महिने लागणार आहेत.

विस्तारित मार्गांचे भूमिपूजन  (Pune Metro Extension)

पुणे मेट्रोच्या चार विस्तारित मार्गांचे भूमिपूजन आज, मंगळवारी होत आहे. त्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. मात्र, नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गांवरील आंबेडकर चौक आणि कर्वे पुतळा येथे महापालिकेने दोन उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. या पुलांचा आराखडा अंतिम कऱण्यासाठी आत्तापर्यंत महामेट्रो आणि पुणे महापालिकेच्या पाच ते सहा बैठका झाल्या आहेत. यावेळी राजकीय नेत्यांकडून ऐनवेळी आलेल्या सूचनांमुळे आऱाखड्यात बदल करण्यात आले.

खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग विस्तारमार्गाचा तिढा  (Pune Metro Extension )

हा आराखडा अंतिम झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या खर्चासह प्रस्ताव ‘महामेट्रोेेे’ ने महापालिकेकडे सादर केला आहे. या दोन्ही उड्डाणपूलांचा ‘महामेट्रो’चा खर्चाचा अंदाज अधिक आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावर दांडेकर पूल चौकात उड्डाणपूल उभारण्याची सुचना महापालिकेने ‘महामेट्रो’ला केली. त्यावेळी ‘महामेट्रो’ने या मार्गांच्या उभारणीसाठी निविदाही काढली.

ऐनवेळी कऱण्यात आलेल्या सूचनेनंतर पुन्हा उड्डाणपूलासह या मार्गांच्या रचनेचा आराखडा तयार करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. मात्र, या एकाच मार्गावररून उच्च क्षमता द्रुतगती मार्ग जात असल्याने उड्डाणपूल, मेट्रो मार्ग आणि ‘ एचसीएमटीआर’ असे तीनही प्रकल्प एकत्र करणे कितपत व्यवहार्य आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात येत आहे.

‘महापालिकेकडून ‘एचसीएमटीआर’चा अंतिम आराखडा मिळत नसल्याने ‘महामेट्रो’ला या मार्गाचाही अंतिम आराखडा सध्या तयार करता आलेला नाही. त्यामुळे या कामाच्या निविदेलाही मुदतवाढ द्यावी लागत आहे, असे सांगण्यात आले.

निविदेला वारंवार मुदतवाढ  (Pune Metro Extension)

नळ स्टॉप ते माणिकबाग आणि खडकवासला ते खराडी या मार्गांच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ ने 26 जूनला निविदा काढली होती. मात्र, महापालिकेकडून होणाऱ्या सूचना आणि बदल यामुळे या निविदेला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. या निविदेला एकूण सहा महिने मुदवाढ देण्यात आली आहे. आता निविदा दाखल करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

काय म्हणतात अधिकारी ? ( Pune Metro Extension)

नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गावरील उड्डाणपुलांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेला पाठविला आहे. याबाबत महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. याचवेळी खराडी ते खडकवासला मार्गावर सुमारे दोन किलोमीटर ‘एचसीएमटीआर’ असेल. त्याचा अंतिम आराखडाही महापालिकेकडून मिळालेला नाही. त्यामुळे या मार्गांच्या उभारणीसाठी काढण्यात आलेल्या निविदांना मुदतवाढ द्यावी लागत आहे.  – अतुल गाडगीळ, संचालक प्रकल्पअधिकारी (महामेट्रो) 

मेट्रो मार्गावरून जाणाऱ्या ‘एचसीएमटीआर’ च्या आराखड्याबाबत ‘महामेट्रो’समवेत बैठका झालेल्या आहेत. हे काम कोणती संस्था करणार आणि त्याच्या खर्चाबाबत महापालिका आयुक्त आणि महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. तसेच, नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील दोन उड्डाणपुलांचा ‘महामेट्रो’ने दिलेला खर्चाचा प्रस्ताव जवळपास दीडपट आहे. त्यामुळे या खर्चाबाबतही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, पुणे महापालिका 

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored