Translate :

Sponsored

NCRB Report Pune Crime, Shocking News, 2026 : ‘विद्येचे माहेरघर की गुन्ह्यांचे केंद्र’ पुण्याची ओळख बदलतेय का ? NCRB अहवाल का सांगतोय ? : Pune Records 2686 Rise In Crimes Against Women As Per Ncrb Report

'विद्येचे माहेरघर की गुन्ह्यांचे केंद्र' पुण्याची ओळख बदलतेय का ? NCRB अहवाल का सांगतोय ?

NCRB Report Pune Crime : ऐकेकाळी पुण्याची ओळक ही शिक्षणाचे माहेरघर, खाद्यसंस्कृती असणारे एक शांत, सुंदर शहर अशी होती. मात्र वर्तमानातील पुणे शहराची ओळख ही ‘गुन्ह्यांचे केंद्र’ अशी होत आहे. 2022 ते 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 26.86 % ची मोठी वाढ झाली असून, 2024 मधील आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.

पुणे : 08-05-2026

‘स्मार्ट सिटी’, शैक्षणिक हब, आयटी हब, शिक्षण-संस्कृतीचे माहेरघर ( NCRB Report Pune Crime) तसेच सुरक्षित शहर अशी ओळख मिरवणारे पुणे शहर आता गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळक मिळवू लागेल आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालाने काळा डाग उमटवला आहे. कारण, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी शहरातील सुरक्षिततेच्या दाव्यांची पोलखोल तर केली आहेच पण पोलीस, प्रशासन आणि समाजव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शहराचा विस्तार वाढवताना आत्ता शहर सुरक्षित म्हणून देखील एक वेगळी ओळक निर्माण कऱण्याची गरज निर्माण झाली आहे. खुनापासून चोऱ्यांपर्यंतच्या आकडोवारीत वर्षाला वाढ होत असतानाच महिला सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वाची होऊ लागली आहे. आकडेवारीनुसार पुण्याची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, त्यातून भयावह वास्तव समोर आले आहे.

महिलांवरील अत्याचार थांबवण्यात यंत्रणेला अपयश (NCRB Report Pune Crime)

पुण्यातील महिलांवरील अत्याचाराच्या सर्वच घटनांमध्ये लक्षणिय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बलात्कार, विनयभंग, विवाहितांचे छळ, ॲसिड हल्ला, सामूहिक बलात्कार तसेच पाठलाग, चोरून व्हिडिओ काढणे, पाळत ठेवणे, अपहरण अशा घटनांत वाढ झाली आहे. पुण्यात 2024 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या तब्बल 2 हजार 631 घटना नोंदविण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये हा आकडा 2 हजार 74 इतका होता.

अवघ्या दोन वर्षात महिलांविरोधातील गुन्ह्यांत 26.86 टक्के वाढ झाली आहे. 2023 मध्ये 2 हजार 550 प्रकरणे होती, त्यातही 2024 मध्ये वाढ झाली आहे. म्हणजेच, महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. हुंड्यासाठी छळ, बलात्कार,विनयभंग, स्टॉकिंग, अपहरण, लैंगिक छळ अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी महिलांचे दैनंदिन आयुष्य असुरक्षित केले आहे. विशेषतः 244 बलात्काराच्या घटना आणि 602 महिलांच्या अपहरणाच्या तक्रारी ही आकडेवारी शहरातील भयावह वास्तवाचे चित्र आहे.

पुण्याची आकडोवारी (NCRB Report Pune Crime)

2024 मध्ये पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, 2022 मधील 2,074 वरून 2023 मध्ये गुन्हे 2550 पर्यंत वाढले आहेत. 2024 मध्ये हे आकडे अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहेत. ज्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार (पोक्सो) ही मोठी समस्या बनली आहे.

महिलांवरील अत्याचारांचा वास्तव मांडणारा अहवाल (NCRB Report Pune Crime)

2022 ते 2024 या दोन वर्षाच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 26.86 % ची मोठी वाढ झाली असून, 2024 मधील आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. या वर्षात महिलांवरील शारिरिक आणि मानसिक छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आल्या आहेत. सर्वाधिक गुन्हे हुंड्यांसाठी छळाचे (514) असून, त्याखालोखाल बलात्काराच्या 244 घटना समोर आल्या आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, विनयभंगाच्या 222, लैंगिक छळाच्या 159 आणि स्टॉकिंगच्या 105 प्रकऱणांची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त हुंडाबळी, समूहिक बलात्कार, ॲसिड हल्ला (19) आणि महिलांचे चोरून व्हिडिओ काढणे (24) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे महिलांमधील भीतीचे वातावरण वाढले आहे.

कठोर उपाययोजनांची गरज (NCRB Report Pune Crime)

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विविध मोहिमा, हेल्पलाईन, पेट्रोलिंग, ‘निर्भया पथक’, यांसारख्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शहरात सीसीटीव्ही,स्मार्ट पोलिसींग आणि महिला सुरक्षा उपक्रमांचे आयोजन होत असले तरी आणखी उपाययोजनांची गरज असल्याचे दिसत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored