Historical Museums in Historic Pune – 2021

Historical Museums in Pune

पुणे शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयं (Historical Museums).

पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं  आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे ‘केळकर’, ‘पेशवे’ आणि ‘मराठा’ अशी तीन ऐतिहासितक वस्तू संग्रहालयं आहेत. मिसलेनियस भारतच्या माध्यामातून शहरातील या तीन ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांची सफर आपण करणार आहोत.

राजा दिनकर केळकर संग्रहालय.

शिवकालोत्तर हिंदुस्थानाचा इतिहास सांगणाऱ्या आणि त्या काळी वापरात असणाऱ्या पारंपरिक वस्तूंचा संग्रह (Historical Museums) असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुण्याचे भूषण आहे. या संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर गंगाधर केळकर हे ‘अतवासी’ नावाने ऐतिहासिक कविता करीत. त्या छंदातून ते इतिहासकालीन वस्तू जमवू लागले. ६५ वर्षे भारतभ्रमण करून त्यांनी जवळजवळ २० हजार वस्तूंचा संग्रह जमवला होता. या पुरातन, ऐतिहासिक वस्तूंची मांडणी एकुण ९ दालने आणि ४० विभागांत केलेली आहे. वनिताकक्ष, स्वयंपाकघरातील भांडे, हस्तीदंत, वस्त्रप्रावरणे, दिवे, अडकित्ते, दौती, खेळणी, वाद्ये, मस्तानी महाल, दरवाजे अशी त्यांची साधारण विभागणी केलेली आहे.

‘मस्तानी महाल’ हा या संग्रहालयाचे आकर्षण बिंदू आहे. बाजीराव पेशव्यांनी कोथरूड येथे इ.स. १७३४ मध्ये मस्तानीसाठी महाल बांधलेला होता. केळकरांनी कुशल कारागिरांच्या मदतीने मूळ ठिकाणाहून हा महाल सोडवून त्याची या ठिकाणी पुर्नबांधणी केली. हा महाल बघून त्या काळच्या वैभवाची प्रचिती येते. अनेक पर्यटक सर्वात जास्त याच ठिकाणी रमतात. येथील अनेक वस्तू बघून तत्कालीन व्यवहारांचा, राहणीचा अंदाज बांधता येतो. तब्बल पाच तप हौस म्हणून जमा केलेला हा संग्रह केळकरांनी इ.स. १९७५ ला सरकारला देणगी म्हणून दिला. या संग्रहालयाला केळकर दांम्पत्याने आपल्या लाडक्या दिवंगत लेक राजा यांचे नाव दिले आहे. येथे भेट देण्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते. तसेच तुम्हाला कॅमेराने फोटो काढायचे असेल कर त्यासाठीही वेगळे शूल्क आकारले जाते. हे संग्रहालय अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केलेले आहे.

पेशवे संग्रहालय.

पुण्याच्या पर्वतीवर स्थापन करण्यात आलेले पेशवे संग्रहालय म्हणजे पेशवे काळातील अनेक आठवणींचा ठेवा आहे. हे संग्रहालय (Historical Museums) ज्या जागेत उभारण्यात आलेले आहे तो वाडा पेशव्यांनी १७९५ मध्ये बांधलेला आहे. सध्या त्याची बाह्यरचना आधुनिक असली तरी आतील भाग पेशवेकालीन पद्धतीच्या दालनांप्रमाणे सजवण्यात आलेला आहे. संग्रहालयाच्या वरच्या दालनात जाताना एका बाजूला जुन्या काळच्या पुण्यातील रस्ते, इमारती, उद्योग – धंदे, रेल्वे, कचेरी आदी छायाचित्रांचा संग्रह आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यावेळच्या अनेक थोरा मोठ्या व्यक्तींची पेंटिंग्ज व पोवाड्यांचे फलक आहे.

Peshwa Museum

शिवकालीन व पेशवेकाळातील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती व छायाचित्रे हे या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर पेशवे व सरदार यांच्यासाठी वापरण्यात येणारी मोठी पालखी, नगारे, ढोल आपल्या दृष्टीस पडतात. बाजूला पेशव्यांच्या घराण्याची वंशावळ, त्यांची अनेक छायाचित्रे, भांडी, कागदपत्रे अशा अनेक ठेवी आहेत.

येथील दिवाणखाना हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. लाकडी कोरीवकाम केलेले खांब व जाळीदार लाकडी भिंतींनी सजवण्यात आलेला हा दिवाणखाणा एक अप्रतिम कलाकुसर पाहिल्याचा आनंद आपल्याला देतो. विविध सरदार आदींच्या जुन्या वाड्यांमधे असणारे कलाकृतीपूर्ण  भाग सुरक्षितपणे हलवून येथे हा दिवाणखाना उभारण्यात आलेला आहे. छत, झुंबरे, खांब अत्यंत देखणे व भव्य आहेत. वरच्या दालनात विविध प्रकारच्या नाण्यांचा संग्रह आहे. खेळणी, भांडी, पानांची तबके, विविध मूर्ती अशा असंख्य वस्तू येथे आहेत.

इतिहासप्रेमी व विशिष्ठ काळाचे अभ्यासक त्यांच्यासाठी हा संग्रह अत्यंत उपयुक्त आहे. आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७:३० ते रात्री ८ पर्यंत हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. येथे भेट देण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. खरं तर पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध अशा पर्वतीला भेट देतानाच या संग्रहालयाला (Historical Museums) भेट देण्याचे निश्चित करा. कारण पर्वती चढून गेल्यावर समोरच आपल्याला हे संग्रहालय दृष्टीस पडते. तेव्हा संपूर्ण पर्वती आणि हे संग्रहालय मिळून चार तास तरी वेळ लागणार हे गृहित धरूनच येथे भेट देण्याचे नियोजन करा.

मराठा इतिहास संग्रहालय.

संग्रहालयांचे पुणे अशी ओळख सार्थ ठरवणारे असे हे पुण्यातील मराठा इतिहास संग्रहालय (Historical Museums) आहे. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये हे संग्रहालय आहे. हे संग्रहालय सन १९३९ मधे सातारा येथे स्थापन करण्यात आले होते. १९५८ ला पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे त्याचे स्थलांतर करण्यात आले. मराठ्यांच्या इतिहासाशी संबधित १८व्या आणि १९व्या शतकातील दुर्मिळ कागदपत्रे येथे जतन केली आहेत. साताऱ्याचे रावबहादूर पारसनीस यांनी मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी कागदपत्रे संपूर्ण भारतातून गोळा करून हे संग्रहालय उभारले आहे. म्हणून या संग्रहालयातील वस्तूसंग्रह ‘पारसनिस वस्तूसंग्रह’ म्हणूनही ओळखला जातो.

या संग्रहालयात (Historical Museums) पारसनिस कलेक्शनखेरीज मराठ्यांच्या इतिहासाचा परिचय करून देणारी मध्ययुगीन काळातील आयुधे, मोडी कागदपत्रे, ताम्रपट, तसेच जुनी हत्यारे, संगमरवरी पुतळे, त्या काळच्या दागिन्यांच्या पेट्या, कंदिल, भांडी, पगड्या असा बराच ऐतिहासिक ऐवज येथे पहायला मिळतो. याशिवाय जुन्या पोथ्या, नकाशे, ३० हजारापेक्षा जास्त कुटुंबाची पत्रे, दोनशेपेक्षा जास्त मूळ हस्तलिखीते, जी संस्कृत, अरबी, पर्शियन आणि इंग्रजी भाषेतील आहेत.

शिवाजी महाराजांच्या कुटुंबासह, पहिले बाजीराव पेशवे, थोरले माधवराव पेशवे आदींची मोडी भाषेतील पत्रे बघणे व वाचणे ही इतिहासप्रेमींसाठी पर्वणी आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला मोडी भाषेचे ज्ञान असायला हवे. मात्र ते नसेल तरी काही बिघडत नाही, कारण आपल्या ऐतिहासिक शूरवीर व्यक्तीरेखांच्या हस्ताक्षरातील पत्रे फक्त पहाणे हेही फार मोठा आनंद देऊन जाते.

खरं तर या डेक्कन कॉलेजचा परिसर निसर्गरम्य आहे. या कॉलेजची वास्तू तर इतकी आकर्षक आहे की तुम्ही येथे प्रवेश करताच तुम्हाला या वातावरणाची भूरळ पडते. या कॉलेजच्या ऐतिहासिक वास्तूसहित हे संग्रहालय (Historical Museums) वारसास्थळांमध्ये गणले जाते. इतिहासाची आवड आणि त्यात रमणाऱ्यांसाठी हे ठिकाण आकर्षण केंद्र आहे. शालेय विद्यार्थ्यांसह इतिहास अभ्यासकांची येथे कायम वर्दळ असते. पहिला व तिसरा शनिवार, रविवार व शासकीय सुट्यांखेरीज हे संग्रहालय सकाळी साडे दहा ते साडे पाच च्या दरम्यान अल्पदरामध्ये पाहण्यासाठी खपले असते. मध्यवर्ती शहरापासून थोडे लांब असणारे हे संग्रहालय एकदातरी नक्की भेट द्यावे असेच आहे.

एकाच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणारे हे तीन संग्रहालयं शब्दशः या शहराचा सांस्कृतिक, ऐतिहासिक (Historical Museums), सामाजिक वारसा आहेत. त्यांचे जतन करणे आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे.

आपण या ठिकाणांना भेट द्यायला कसे जाल ?

Author ज्योती भालेराव.

1 thought on “Historical Museums in Historic Pune – 2021”

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!