Translate :

Sponsored

School Bus Saftey Rule, Great News, 2026 : शाळेच्या बससाठी आता नवे नियम लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय : Student Safety School Bus Tracking Now On Parents Mobile Phones State Governments Decision

शाळेच्या बससाठी आता नवे नियम लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय

School Bus Saftey Rule : राज्य शासनाने मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बसेससाठी काही नियम अनिवार्य केले आहेत. बस वाहतुकीच्या दरवाढी संदर्भात सुद्धा एक मह्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : 24-07-2026

राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ( School Bus Saftey Rule) राज्यातील स्कूल बस आणि व्हॅनसाठी नवे सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. आता सर्व  शालेय वाहनांमध्ये एआयएस 140 मानकांनुसार जीपीएस, सीसीटिव्ही कॅमेरे, सीट बेल्ट, पॅनिक बटण आणि डिजिटल सुरक्षा  निरीक्षण प्रणाली अनिवार्य असणार आहे.

यासोबतच पालकांना मोबाईल ॲपद्वारे आपल्या मुलांच्या बसचे लाईव्ह लोकेशन आणि सीसीटिव्ही फुटेजही पाहता येणार आहे. सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस नियमन)  प्रथम सुधारणा नियम, 2026 अधिसूचित केले आहेत.

डिजिटल नोंदी असणार ( School Bus Saftey Rule)

नव्या नियमावलीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बसमध्ये चढण्याची आणि उतरण्याची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये महिला परिचारिका किंवा अधिकृत कर्मचाऱ्याची उपस्थिती बंधनकारक असेल, तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा तरतूदी कऱण्यात आल्या आहे आहेत.

याशिवाय सरकारने प्रथमच स्कूल बसच्या भाड्यालाही नियमांच्या कक्षेत आणले. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण प्रति विद्यार्थी प्रति किलोमीटर भाडे निश्चित करेल. नव्या नियमांनुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वाहनांना 3 महिन्यांच्या आत नव्या सुरक्षा व्यवस्थेनुसार सुसज्ज करावे लागणार आहे.

नियमांचे पालन न केल्यास संबंधित वाहनांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस) ( प्रथम सुधारणा) नियम , 2026 अधिसूचित कऱण्यात आले आहेत. परिवहन विभागाने सर्व शाळा व्यवस्थापन, स्कूल बस व व्हॅनचालक, वाहनमालक आणि पालकांना या नियमांची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याते आवाहन केले आहे.

परिवहन समितीची स्थापना होणार ( School Bus Saftey Rule)

परिवहन समिती स्थापन करणे, बस चालक आणि परिचारकांचे पोलिस पडताळणी तसेत वैद्यकीय तंदुरूस्ती प्रमाणपत्र अनिवार्य असेल. सरकारता दावा आहे की, यामुळे शालेय वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनेल. दिव्यांग आणि विशेष गरजा असेलल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाय्य व्यवस्था करणे बंधनकारक असेल. तसेच किमान 30 दिवसांपर्यंत सीसीटिव्ही फुटेज सुरक्षित ठेवणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored