World Introvert day –  ( start – 2 January 2011)

World Introvert day
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

जागतिक अंतर्मुख दिवस –( सुरूवात २ जानेवारी २०११ )

जगात अनेक प्रकारची माणसं असतात. मात्र माणसाचे स्वभाव जर दोन प्रकारात विभागायचे म्हटलं तर ते अंतर्मुख माणसं (World Introvert day ) आणि बहिर्मुख माणसं असे ते प्रकार आहेत. मात्र त्यातील अंतर्मुख माणसांना समजणे थोडे कठिण असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा अंतमुर्ख माणसांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जागतिक अंतर्मुख दिवस (World Introvert day )  साजरा केला जातो.

जागतिक अंतर्मुख दिवसाची (World Introvert day )  सुरूवात कधी झाली ?

पहिला जागतिक अंतर्मुर्ख दिन २०११ मध्ये सुरु करण्यात आला. त्यासाठी वर्षातील पहिल्या महिन्याच्या दोन तारखेची निवड करण्यात आली. म्हणजेत २ जानेवारी २०११ ला या जागतिक अंतर्मूख दिवस (World Introvert day )  साजरा करण्याची संकल्पना राबवण्यास सुरूवात झालेली आहे.

World Introvert day

कोणी केली जागतिक अंतर्मुख दिनाची (World Introvert day )  सुरूवात ?

मानसशास्रज्ञ आणि लेखक फेलिसिटास हेन यांनी या दिवसाची संकल्पना मांडली.

फेलिसिटास हेन यांच्याविषयी –

फेलिसिटास हेन या जर्मनीतील सर्वात प्रसिद्ध मानसशास्रज्ञ आणि सर्वाधिक खपाच्या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक लेख, रेडिओ आणि टिव्ही वरील कार्यक्रम यांच्या माध्यमातून मनोवैज्ञानिक समस्यांवर लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मानसिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली आहे.

फेलिसिटास हेन यांनी हा दिवस साजरा करण्यास का सुरुवात केली, हे सांगताना, त्या म्हणतात की, अंतर्मुख व्यक्तींचे अद्वितीय गुण ओळखण्याच्या आणि ते साजरे करण्याच्या हेतूनेच मी जागतिक अंतर्मुख दिवस (World Introvert day ) साजरा करण्याची संकल्पना मांडली.

या लोकांना बहिर्मुख लोकांच्या जगात अंतर्मुख लोकांना एक दिवसतरी ओळखले जावे हा या दिवसाचा (World Introvert day ) उद्देश आहे. अंतर्मुख व्यक्तींच्या समाजातील योगदानाविषयी आणि त्यांच्याठायी असणाऱ्या गुणांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्या वाट्याला कौतुक व्हावे हाच उद्देश आहे.

त्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन (एपीए) आंतरराष्ट्रीय संलग्नकार आणि जर्मन सायकोलॉजिकल असोसिएशन (बीडीपी) च्या सदस्य आहेत. त्या आयपरसोनिक या वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास प्रणालीच्या (ॲपच्या ) निर्माणकर्त्या सुद्धा आहेत. ही प्रणाली म्हणजे एक व्यक्तिमत्व विकासाची चाचणी आहे.

२६ भाषांमध्ये उपलब्ध असणारी ही प्रणाली जगातील १५० हून अधिक देशामध्ये वापरतात. तुम्ही जर तुमचे व्यक्तीमत्व कोणत्या प्रकारचे आहे हे चाचणीद्वारे जाणून घेतल्यास तुम्हाला त्याचा फायदा अनेक बाबतीत होऊ शकतो. तुमचे करियर, तुमचे नातेसंबंध घडवताना तसेच तुमचे आरोग्य जपण्यासाठी या चाचणीचा विशेष उपयोग होतो.

अंतर्मूख व्यक्तींविषयीचे गैरसमज – (World Introvert day )  

अंतर्मूख व्यक्ती या अनेकदा त्यांच्या स्वभावाच्या वैशिष्ट्यांमुळे गैरसमजाच्या बळी ठरतात. जगातील जास्त लोकसंख्या ही बहिर्मूख व्यक्तिमत्वांची आहे. त्यामुळे अंतर्मूख व्यक्तीमत्वांची अनेकदा या जगात गर्विष्ठ,एकलकोंडे , विचित्र स्वभावाचे म्हणून हेटाळणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. ते गर्विष्ठ किंवा हेकेखोर नसतात, तर फक्त त्यांची कामाची, वागण्याची पद्धत इतरांपेक्षा थोडी वेगळी असते. एकटे रहाणे त्यांना आवडते.

  • अंतर्मुख लोकं लाजाळू असतात, असा लोकांचा गैरसमज असतो. मात्र ते तसे नाही. अंतर्मुखता आणि लाजाळूपणा यात फरक आहे.
  • अंतर्मुख व्यक्ती सामाजिक उपक्रमांपासून लांब रहातात. खरं तर ते लांब रहात नाहीत, मात्र त्यांची सहभाग घेण्याची पद्धत वेगळी असू शकते.
  • हे लोक कोणाशीही मैत्री करत नाही. प्रत्यक्षात हे लोक पटकन विश्वास ठेवत नाहीत, मात्र ते एकदा विश्वास पटला की मैत्री करतात.
  • अंतर्मुख म्हणजे सर्जनशीलता असा एक सहज होणारा गैरसमज आहे. मात्र तो खरा नाही, अंतर्मुख किंवा बहिर्मुख असण्याशी सर्जनशीलता असण्याचा काहीही संबंध नाही.

अंतर्मुख व्यक्तीमत्वाच्या लोकांची संख्या कमी असली तरी अंतर्मुख व्यक्ती या प्रतिभावान असल्याचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या जास्त आहेत. अनेक शास्रज्ञ, तत्वज्ञ, कलाकार, लेखक, विचारवंत हे बऱ्याचदा अंतर्मुख स्वभावाचे असल्याचे दिसून येते. हे लोक ज्या विचारात असतात, त्याप्रमाणेच त्यांचे जग ते तयार करतात. मात्र त्यांना या स्वभावामुळे बऱ्याचदा आरोग्य विषयक समस्या, नोकरी संबंधीत समस्या आणि कठिण नातेसंबंधांचा सामना करावा लागतो.

अंतर्मुख व्यक्ती कशा ओळखाल ?

– अंतर्मुख व्यक्ती एकांतात वेळ घालवायला आवडतं. त्यांना शक्यतो नेहमीच एकटं रहायला आवडतं.

-अंतर्मुख व्यक्ती बऱ्याचदा भल्यामोठ्या मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात रहाण्यापेक्षा त्यांना छोट्या ग्रुपमध्ये रहायला आवडतं.

– हे लोकं शांत स्वभावाचे असतात. त्यांचा स्वभाव इतरांना समजण्यासाठी कठीण असतो. त्यांच्या मनातील ओळखणे सामान्यतः फार कठिण असते.

– त्यांना स्वतःच्या स्वभावाविषयीची व्यवस्थित माहिती असते. ते स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतात.

अंतर्मुख असण्याचे काही फायदे –

हे लोक चांगले श्रोते असू शकतात. स्वतःविषयी बोलण्यापेक्षा ते समोरच्याचे एकुण घेतात. त्यामुळे ते समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक एकतात.त्यातून त्यांना नेहमी फायदाच होतो. त्यातून त्यांचा स्वभाव अधिक चौकस होतो.

जागतिक अंतर्मुख दिवस (World Introvert day )  कसा साजरा कराल ?

  • संस्थापक फेलिसिटस हेन यांनी लिहिलेले हॅप्पीली इंट्रोव्हर्टेड एव्हर आफ्टर हे विनामुल्य ई-पुस्तक डाऊनलोड करून वाचू शकता.
  • प्रसिद्ध अंतर्मुख व्यक्तींबद्दल माहिती घ्या. त्यांच्या व्यक्तीमत्वातल्या प्रेरणा देणारे पैलू जाणून घ्या.
  • अंतर्मुख व्यक्तिमत्व साकारलेले चित्रपट, नाटक, पुस्तकं यांचा शोध घेऊन ते बघा.

भारतामध्ये हा दिवस (World Introvert day )  सोशलमीडियाच्या माध्यमातून साजरा केला जातो. असे केल्याने अंतर्मुख व्यक्तींच्या विषयी असणाऱ्या गैरसमजांना दूर करायला मदत होते. तुमच्याही आसपास अशा व्यक्तीमत्वाचे लोक असतील तर त्यांना समजून घेण्यासाठी, तुम्ही या दिवसाविषयीची माहिती करून घेऊन त्यांच्या आनंदी जीवनासाठी नक्कीच हातभार लावू शकता. म्हणूनच आपल्या सोशलमीडियावर कॅंम्पेन चालवून, किंवा #interovertday असा हॅशटॅग वापरून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.

  • ज्योती भालेराव

Leave a Reply

World Introvert day –  ( start – 2 January 2011)