Table of Contents
विश्व मान्यतेसाठी साजरा केला जाणारा ‘विश्व हिंदी दिन’ -२०२५ – (सुरूवात- १० जानेवारी २००६)
भारतासारख्या विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या देशात सर्वात जास्त भाषा बोलली जाते ती, म्हणजे हिंदी भाषा. म्हणूनच इतर देशांमध्येही हिंदीचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि तीला आंतरराष्ट्रीय दर्जाही मिळावा यासाठी दरवर्षी १० जानेवारीला जगभरात ‘विश्व हिंदी दिन’ ( World Hindi Day – 2025 ) साजरा केला जातो.
विश्व हिंदी दिनाची सुरूवात कधी झाली ?
जगभरात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सुरुवातीला विश्व हिंदी संमेलन भरवण्यास सुरूवात झाली ती १० जानेवारी १९७४ ला. नागपूर येथे पहिले विश्व हिंदी संमेलन भरले होते.पुढे यापासूनच प्रेरणा घेऊन १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस( ‘World Hindi Day’-2025 ) साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन –
सन १९७४ ला तत्कालिन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचे उद्धाटन केले होते. पुढे १९७५ पासून इतर देशांमध्ये जसे मॉरिशस, युनायटेड किंगडम, त्रिनिदाद आणि टोबैगो, अमेरिका अशा विविध देशात विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
विश्व हिंदी दिनाची सुरूवात –
विश्व हिंदी संमेलन १९७४ पासून आयोजित करण्यात येत असले तरी विश्व हिंदी दिवस ( ‘World Hindi Day’-2025 ) साजरा करण्याची सुरूवात ही २००६ पासून झाली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी १० जानेवारी २००६ ला पहिला विश्व हिंदी दिन साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर तो प्रत्येकवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानंतर भारतीय विदेश मंत्रालयातही हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली.
हिंदी भाषा आणि हिंदी दिनाचे ( ‘World Hindi Day’-2025 ) काही ठळक वैशिष्ट्ये –
- पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ ला महाराष्ट्रातील नागपूर येथे झाले.
- या संमेलनात ३० देशांचे एकुण १२२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
- विश्व हिंदी दिवसाची ( ‘World Hindi Day’-2025 ) संकल्पना २००६ मध्ये मांडण्याक आली.
- नॉर्वेमध्ये पहिला विश्व हिंदी दिवस ( ‘World Hindi Day’-2025 ) भारतीय दुतवासातर्फे साजरा करण्यात आला.
- त्यानंतर भारतासह पोर्ट लुईस, स्पेन, लंडन, न्युयॉर्क, जोहान्सबर्ग येथे विश्व हिंदी दिवस ( ‘World Hindi Day’-2025 ) साजरा करण्यात आला आहे.
- संपूर्ण जगभरात हिंदी ही पाचव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. जगभरात मिळून करोडो लोक हिंदी भाषा बोलतात.
- दक्षिण प्रशांत महासागरातील मेलानेशियामधिल फिजी या द्विपसमुहावर हिंदी भाषेला आधिकारिक भाषेचा दर्जा दिला आहे.
- विश्व आर्थिक मंचाच्या गणनेनुसार हिंदी जगभरातील पहिल्या १० भाषांमधील एक शक्तिशाली भाषा मानली जाते.
- २०१७ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पहिल्यांदा अच्छा, बडादिन, बच्चा, सूर्यनमस्कार सारख्या शब्दांचा समावेश केला.
- भारतात इंग्रजीसह हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा आहे.
हिंदी ही राष्ट्रभाषा की राजभाषा –
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसून तिला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारताच्या संविधानात हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा कोणताही उल्लेख नाही.
हिंदी आणि इतर काही देश –
भारतातील सर्वात जास्त भूभागावर हिंदी बोलली जाते. तसेच ती जगातील इतर अनेक देशांमध्ये बोलली जाते. जसे की फिजी, मॉरिशस, गयाना, सुरीनाम, नेपाळ आणि संयुक्त अरब अमीरात मध्ये हिंदी किंवा त्याच्या इतर बोली बोलल्या जातात. अबूधाबीमध्ये तर २०१९ ला न्यायालयिन कामकाजासाठी हिंदी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
अशा या हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला इतर देशांमध्ये चालना मिळावी म्हणून हा विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. जसे इंग्लिश भाषेतील चित्रपटांचे हॉलिवूड जगभर प्रसिद्ध आहे तसेच हिंदी भाषिक चित्रपटांचे बॉलिवूडही आज जगात आपली ओळख निर्माण करून आहे. यातूनच या भारतीय भाषेविषयीची लोकप्रियता लक्षात येते. समस्त भारतीयांना आणि विशेषतः ज्यांची मातृभाषा हिंदी आहे अशा समस्त देशबांधवांना मिसलेनियस भारततर्फे विश्व हिंदी दिनाच्या ( ‘World Hindi Day’-2025 ) शुभेच्छा.
- ज्योती भालेराव