Unique Architecture in Barcelona: Sagrada Familia – ( Construction Period – 1882 to 2026 )

sagrada familia
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

Table of Contents

बार्सिलोनामधील अद्वितीय वास्तुकला: सग्रादा फॅमिलिया – ( निर्मिती कालावधी –  १८८२ ते २०२६ )

जगभरात जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या ज्या अनेक वास्तू आहेत, त्यांची निर्मिर्ती ही सहसा ऐतिहासिक काळात झालेली आहे. मात्र आज मी तुम्हाला ‘सग्राडा फॅमिलिया’ (Sagrada Familia ) या जागतिक वारसास्थळाविषयीची माहिती देणार आहे,ज्याच्या निर्मितीची सुरुवात सुमारे इ.स.१८८२ च्या दरम्यान झालेली आहे आणि आजच्या काळातही त्याची निर्मिती सुरूच आहे.    

आज जगात अशा किती वास्तू आहेत, ज्यांची निर्मिती ही, ऐतिहासिक काळ आणि आधुनिक काळ अशा दोन्ही काळात झाली  आहे ? अशा किती वास्तू आहेत ज्यांच्या बांधकामात सुरूवातीला जुन्या आणि नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे ? ज्याच्या बांधकामात इतिहास आणि वर्तमान अशा दोन्हीची झलक आपण पाहू शकतो. तुम्हाला अशी कोणती वास्तू माहित असेल तर मला नक्की कळवा.

परंतु मी आजपर्यंत पाहिलेल्या अनेक जागतिक वारसास्थळांपैकी ‘सग्रादा फॅमिलीया’ (Sagrada Familia ) ही एकमेव अशी वास्तू आहे, जीचे बांधकाम सुमारे दोनशे वर्षांपासून सुरू आहे. चला तर मग या आगळ्यावेगळ्या वास्तूची आपण सफर करूयात.

Sagrada Familia

साग्राडा फॅमिलियाचे (Sagrada Familia ) बांधकाम केव्हा आणि कसे सुरू झाले ?

सग्राडा फॅमिलियाचे (Sagrada Familia ) बांधकाम इ.स. १८८२ मध्ये सुरू झाले, जेव्हा वास्तुविशारद फ्रान्सिसो दे पॉल डेल विलार यांनी या विशाल चर्चचा पाया घातला. त्यांना या चर्चच्या माध्यमातून गॉथिक प्रकारच्या चर्चच्या रचनाकलेचे पुरूत्थान करायचे होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या चर्चच्या एका छोट्या भागाचे काम तसे करण्यात आले, मात्र नंतर या बांधकामाची सर्व सुत्रे अँटोनी गौडी या जगप्रसिद्ध वास्तूरचनाकाराकडे देण्यात आले.

खरं तर सग्राडा फॅमिलिया (Sagrada Familia ) या चर्चची कल्पना ही एका साध्या पुस्तक विक्रेत्याची होती. त्याचे नाव जोसेफ मारिया बोकाबेल्ला असे होते. तो एका धार्मिक संघटनेचा कार्यकर्ता होता. वेटिकन शहराच्या एका यात्रेदरम्यान तो इटलीमधून परतत असताना त्याने ‘सग्राडा फॅमिलिया’ हे चर्च बांधण्याचा मनसुबा बनवला ज्याची निर्मिती ही लोकवर्गणीतून करण्यात येईल. त्याप्रमाणे पुढील अनेक वर्ष हे काम संथगतिने सुरू राहिले.

Sagrada Familia

सग्राडा फॅमिलीयाचे (Sagrada Familia ) डिझाइन आणि आर्किटेक्टचे योगदान –

सग्राडा फॅमिलीयाचे (Sagrada Familia ) मुळ डिझाइन गॉथिक शैलीवर आधारित होते, परंतु लवकरच वास्तुविशारद ‘अँटोनी गौडी’ यांना या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली, ज्यांनी या वास्तूच्या निर्मीतीकलेत आधुनिकतेचा स्पर्श दिला. त्यामुळेच आज आपण जी वास्तू बघत आहोत त्यात जुन्या नव्याचा संगम आढळून येतो. 

बांधकाम करतानाची सुरुवातीची आव्हाने –

सुरुवातीच्या टप्प्यात बांधकाम साहित्याचा तुटवडा आणि तांत्रिक आव्हाने होती, ज्यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीला संथपणा येत गेला.  त्यानंतर स्पेन मधील अंतर्गत युद्धामुळे या भव्य प्रकल्पाला काही काळापुरती स्थगिती आली होती. अशा अनेक आव्हानांचा सामना करत करत या (Sagrada Familia ) भव्यदिव्य वास्तूचे काम आजच्या काळातही अजुनही सुरूच आहे.

Sagrada Familia

वास्तूविशारद अँटोनी गौडी यांच्याविषयी –

जगप्रसिद्ध अशा या वास्तूविशारदाची आपण थोडक्यात माहिती घेऊ. गौडी यांचा जन्म २५ जून १८५२ ला रेऊस, कातालोन्या, स्पेन येथे झाला. त्यांचे मुख्य काम कायमच वास्तूरचना, धर्म आणि निसर्ग यांच्याभोवतीच व्यतीत करण्यात आल्याचे दिसून येते.  

गौडीची वास्तुशिल्प शैली आणि वैशिष्ट्ये

गौडी हे त्यांच्या दोलायमान रंगांच्या वापरासाठी, अनोखे, निसर्गातील घटकांच्या आकारांशी साधर्म्य दाखवणाऱ्या डिझाईन्समुळे आणि निसर्गाने प्रेरीत असलेल्या नैसर्गिक आकृतिबंधांसाठी ओळखले जात होते.

Sagrada Familia

गौडी आणि साग्राडा फॅमिलीया (Sagrada Familia ) यांचे नाते

१८८३ मध्ये, गौडीने हा सग्राडा फॅमिलीयाचा प्रकल्प (Sagrada Familia ) हाती घेतला आणि ते पुढील त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे ध्येय बनले. त्यांनी केवळ या वास्तूच्या रचनेला पूर्णपणे नवीन दिशाच दिली असे नाही, तर या वास्तूच्या निर्मीतीमध्ये त्यांनी धर्म आणि निसर्गाचे मिश्रण चितारण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळते.

गौडीचे महत्त्वपूर्ण योगदान आणि बांधकामातील बदल.

गौडीने बांधकामादरम्यान डिझाइनमध्ये जटिल आणि भव्य स्पायर्स, असाधारण गॉथिक घटक आणि त्यांची प्रसिद्ध कॅटलान शैली समाविष्ट केली.

 आधुनिक युगातील बांधकाम

गौडीनंतरचे बदल आणि त्यांचे परिणाम या वास्तूच्या निर्मीतीमध्ये दिसून येतात.गौडीच्या मृत्यूनंतर, अनेक वास्तुविशारदांनी सग्राडा फॅमिलियाच्या (Sagrada Familia ) बांधकामात योगदान दिले आणि त्याच्या मूळ योजनेचे पालन करताना आधुनिक तंत्रांचा वापर केला. गौडी यांच्या प्रतिभेचा ठसा या वास्तूमध्ये कायम ठेवत आधुनिक बदल केल्याचे आपल्याला पहायला मिळते.

Sagrada Familia

सध्याची बांधकाम प्रक्रिया आणि तंत्रे

अलिकडच्या काळात या चर्चच्या (Sagrada Familia ) उर्वरित बांधकामासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि 3D प्रिंटिंगचा वापर केला जात आहे, ज्यामुळे बांधकाम जलद आणि अधिक अचूक होत आहे.

बांधकामाची सद्यस्थिती

आजही या (Sagrada Familia ) वास्तूचे  बांधकाम चालू आहे आणि 2026 पर्यंत ते पूर्ण होणार आहे, जे गौडी यांच्या 100 व्या पुण्यतिथीला समर्पित केले जाणार आहे.

आर्किटेक्चरल वैशिष्ट्ये

 रचना

इमारतीचा (Sagrada Familia ) बाह्य भाग आणि तिची अनोखी वैशिष्ट्ये हे या वास्तूचे प्रथम आकर्षण म्हणता येईल. साग्राडा फॅमिलियाचा बाह्य भाग अत्यंत भव्य आहे, ज्यामध्ये किचकट कोरीवकाम करण्यात आले आहे. या उंच कोरीवकामामुळे येथे  एक दिव्य वातावरण निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते.

मुख्य प्रवेशद्वारापाशीच पर्यटक बराच काळ रेंगाळताना दिसतात. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे कोरीव काम करण्यात आलेले आहे. याशिवाय अनेक धार्मिक चिन्हांचा वापर करण्यात आला आहे.

जोरदार घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजात या (Sagrada Familia ) वास्तूच्या समोर उभे राहिल्यावरच आपल्याला समजते की, बाहेरून ही वास्तू जितकी भव्य आहे तितकीच ती आतून असणार आहे. आणि खरोखर या चर्चची वास्तूशैली तुमची निराशा करत नाही.

भौतिक रचना आणि साहित्य

सुरुवातीला म्हणजे फार पूर्वी सग्राडाचे (Sagrada Familia ) बांधकाम सुरू झाले तेव्हा याच्या बांधकामात दगड वापरला जायचा, मात्र आता त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी काँक्रीट आणि स्टीलचाही समावेश केला जात आहे.

इमारतीच्या आतील स्थापत्यविषयक तपशील

युरोपमधील अनेक मोठ्या चर्चप्रमाणेच याचीही (Sagrada Familia ) आहे. मात्र या चर्चची खास गोष्ट आहे ते येथील रंगीबेरंगी काचांची तावदानं, खिडक्या आणि भिंतींवरील त्यांच्या रचना होय. आत प्रवेश करताच तुम्हाला एका अनोख्या वातावरणाचा आभास होतो.

 आतमध्ये, फार भव्य आणि उंच स्तंभ  आहेत. रंगीबेरंगी काचेच्या खिडक्यांमधून बाहेरील हलकासा प्रकाश आत डोकावत असतो. या चर्चचा हॉल बराच मोठा आहे. बाजूने आणि मध्यभागी पर्यटक आणि भक्तांसाठी बसण्याची सोय आहे.

सग्राडा चर्चची (Sagrada Familia ) सर्वात खास गोष्ट ही आहे की, येथील बांधकामात धार्मिक आणि सांस्कृतिक चिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे. इमारतीचा प्रत्येक भाग धर्म आणि अध्यात्माची चिन्हे सादर करतो, विशेषत: या इमारतीचे तीन दर्शनी भाग.

साग्राडा फॅमिलियामधील (Sagrada Familia ) चिन्हांचे महत्त्व आणि त्यांचा अर्थ

नेव्हची रूपकं, येशूचा जन्म आणि पुनरुत्थान या घटना रचनांद्वारे येथे सादर केल्या आहेत.वेगवेगळ्या भागांचे लाक्षणिक अर्थ -प्रत्येक भागामध्ये एक कथा उलगडत असते – येशूच्या जन्मापासून त्याच्या जीवनातील घटनांपर्यंत हे येथिल कोरीव कामांचे वैशिष्य सांगता येईल.

 प्रकाश आणि आवाज

इमारतीच्या (Sagrada Familia ) आतील प्रकाशाचा प्रभाव असा योजन्यात आला आहे की,  काचेच्या खिडक्यांमधून प्रकाश फिल्टर केल्याने एक अद्भुत दृश्य अनुभव मिळतो, जो दिवसाच्या वेळेच्या प्रकाशानुसार बदलतो.

आवाजाचे नैसर्गिक गुणधर्म आणि त्याची भूमिका  इमारतीची रचना अशी आहे की प्रत्येक कोपऱ्यातून येणारे ध्वनी व्यवस्थित आणि चैतन्यशील वाटतात, ज्यामुळे धार्मिक कार्यक्रमांना भव्यता येते.आतील सजावट आणि विविध रंगांचे संयोजन,  रंगीबेरंगी काचा उत्कृष्ट सौंदर्य आणि आंतरिक शांतीची अनुभूती देतात.

 धार्मिक आणि सामाजिक महत्त्व

कॅथोलिक चर्च म्हणून (Sagrada Familia ) सग्राडा फॅमिलीयाची भूमिका महत्त्वाची आहे. साग्राडा फॅमिलिया हे एक प्रतिष्ठित कॅथोलिक चर्च आहे, जे असंख्य धार्मिक यात्रेकरूंना आकर्षित करते. धर्म आणि संस्कृतीत त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. हे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांचे केंद्र आहे आणि कॅथोलिक परंपरांचे संरक्षक आहे. मुख्य धार्मिक समारंभ आणि कार्यक्रम येथे आयोजित केले जातात, जे सांस्कृतिक समृद्धीचा पुरावा देतात.

  पर्यटन आणि समाज

सग्रादा फॅमिलियाचे (Sagrada Familia ) पर्यटन आकर्षण म्हणून फार  महत्त्व आहे. हे स्पेनमधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे, जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. अनेक वर्षांपासून याचे काम सुरू असतानाही पर्यटकांची येथे रांग लागलेली असते.

स्थानिक समुदायावर परिणाम – स्पेन मधील स्थानिक समुदायासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्याकडून येथे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

सग्राडा चर्चला (Sagrada Familia ) भेट देण्यासाठी लाखोंनी पर्यटक भेट देत असतात. त्या पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत मोठे योगदान होते. पर्यटन उद्योगाला मोठा फायदा होतो, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते.

 विवाद आणि टीका

या वास्तूच्या बांधणीच्या सुरूवातीच्या कालखंडापासूनच अनेक वाद आणि टिका होत आलेल्या आहेत. प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रियेदरम्यान हे वाद दिसून येतात. बांधकामाचा दीर्घ कालावधी आणि संबंधित खर्च अनेकदा वादाचा विषय झाला आहे.

जशी टिका होत असते तसेच या वास्तूचे (Sagrada Familia ) फार कौतुकही होते. त्याच्या अनोख्या रचनेसाठी आणि भव्यतेसाठी हे कौतुक केले जाते. ही वास्तू अति भव्य निर्माण केल्यामुळे तिच्यावर कधी कधी टिका होते तर कधी कौतुक.

रचनेत समन्वय आणि नाविन्य

जसजशी ही (Sagrada Familia ) वास्तू साकारत गेली, तसतशी तिची भव्यता वाढली. सुरुवातीला ठरवलेल्या आकारापेक्षा फार मोठी आजची भव्य आकारमानाची वास्तू आपल्याला दिसत आहे. मात्र वाढलेल्या भव्यतेमुळे संपूर्ण वास्तू मध्ये सुरक्षित समन्वय साधने हे त्याच्या निर्माणकर्त्यांसमोर मोठे आव्हान ठरले. मात्र या आव्हानांमुळेच बांधकामशास्रामध्ये अनेक नवनविन शोधही लागले. त्यातूनच सध्याची भव्यता साकारण्यात आली आहे.

 साग्राडा फॅमिलियाचे (Sagrada Familia ) महत्त्वाचे पैलू –

 प्रेरणा आणि कला –

जगभरातील कलाकार आणि वास्तुविशारदांवर त्याचा प्रभाव आहे. साग्राडा फॅमिलियाच्या कला आणि डिझाइनने जागतिक स्तरावर कलाकार आणि वास्तुविशारदांना प्रेरणा दिली आहे.

कला आणि वास्तुकला क्षेत्रातील योगदान –

एक संग्रहालय म्हणून देखील  ही वास्तू स्थापित आहे. ते एक कला आणि वास्तुकला संशोधन केंद्र आहे. प्रेरणा स्त्रोत म्हणूनही सग्राडाची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक कलाकार आणि कला विद्यार्थ्यांची ती प्रेरणा आहे. तो लोकांसाठी प्रेरणास्रोत राहिला आहे.

Sagrada Familia

 युनेस्को जागतिक वारसा स्थळ

2005 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सग्राडा फॅमिलियाचा (Sagrada Familia ) समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा म्हणून मान्यता दिल्यानंतर, या मान्यतेमुळे तो आंतरराष्ट्रीय संवर्धनाचा विषय बनला आणि त्यात अनेक संरचनात्मक पावले उचलली गेली.

वारसा संवर्धन आणि संरक्षणासाठी उपाययोजना

या वास्तूच्या संवर्धनासाठी आधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे, जेणेकरून त्याचा टिकाऊपणा टिकून राहील. येथील सुरक्षाव्यवस्थासुद्धा वाखाणण्यासारखी आहे. मुख्य प्रवेशद्वारात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून कडेकोट बंदोबस्तात पर्यटकांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली जाते.

भविष्यातील  योजना

येथील प्रशासनाचे एकमेव ध्येय आहे की, लवकरात लवकर सग्राडाचे (Sagrada Familia ) बांधकाम पूर्ण करणे. 2026 पर्यंत बांधकाम पूर्ण करणे हे त्यांचे प्राधान्य आहे, ज्यामुळे जगातिल पर्यटकासांठी पूर्ण क्षमतेने ही वास्तू खुली करण्यात येईल. आणि त्याचे महत्त्व आणि भव्यता आणखी वाढेल.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि फायदे 

गेल्या काही वर्षातील डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सग्राडाच्या (Sagrada Familia ) बांधकाम आणि डिझाइनमध्ये अचूकता आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या रखडलेल्या कामाचा अशारितीने एकप्रकारे फायदा झालेला आहे.

सग्राडा फॅमिलीयाला (Sagrada Familia ) प्रख्यात व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी याला भेट दिली आहे आणि त्याचे स्वरूप आणि महत्त्व यांचे कौतुक केले आहे. कारण सग्राडा हे स्थापत्यशास्त्रातील नावीन्यपूर्ण आणि पारंपारिक कॅथोलिक  संमिश्रणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

चित्रपट आणि साहित्यातील योगदान

चित्रपट आणि साहित्यात सागरदा फॅमिलियाची (Sagrada Familia ) अनेक वेळा उपस्थिती दर्शविण्यात आलेली आहे. अनेक चित्रपट आणि साहित्यात त्याचे चित्रण केले गेले आहे, जे तिची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खोली दर्शवते.

सांस्कृतिक संदर्भ आणि अर्थ

अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या बांधकामामुळे ही (Sagrada Familia ) वास्तू म्हणजे सांस्कृतिक संदर्भांचा एक ठेवा बनली आहे, जे त्याचे वेगळेपण आणि सौंदर्य परिभाषित करते.

सग्राडाशी संबंधित संस्थांची भूमिका

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा या (Sagrada Familia ) वास्तूच्या संवर्धन आणि बांधकामात सक्रियपणे सहभागी आहेत. या संस्था व्यवस्थापन आणि ऑपरेशनमध्ये मदत करतात, जेणेकरून ते सुरळीतपणे सुरू करता येईल.त्यांच्याद्वारे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात, जे या वास्तूच्या अनेक उपक्रमांना चालना देतात.

Sagrada Familia

पर्यटकांना कायम पडणारे काही प्रश्न –

सागरदा फॅमिलियाचे (Sagrada Familia ) बांधकाम कधी पूर्ण होणार?

सध्याची अंदाजित तारीख 2026 आहे, जी गौडीच्या 100 व्या पुण्यतिथीशी निगडित आहे.

गौडीनंतर बांधकामाचे नेतृत्व कोणी केले?

गौडीनंतर, डुमेंक सुग्रानास आणि जॉर्डी फॉली यांसारख्या अनेक प्रख्यात वास्तुविशारदांनी त्याच्या योजनेवर आधारित बांधकाम कार्य समृद्ध केले.

सरगाडा फॅमिलीला (Sagrada Familia ) भेट देण्यासाठी तिकिट बुकिंग आवश्यक आहे का?

होय, येथे भेट देण्यासाठी तिकिटे बुक केली जातात. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन बुकिंगचा पर्याय निवडू शकता. बुकिंग केले असल्यास, तुम्हाला ठराविक वेळ दिली जाते त्यावेळेत तुम्ही येथे भेट देऊ शकता. यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो. रांगेत गर्दीत उभे रहाण्याचे कष्ट कमी होतात आणि तुम्ही इतक्या लांब आल्यावर गर्दीमुळे तुमची भेट राहून जाण्याची शक्यता कमी होते.

जगात अनेक अशा वास्तू आहेत ज्यांना तुम्ही एकदातरी भेट द्यायला हवीच असे वाटू शकते. भारतातील अजिंठा-वेरूळ लेणी, ताजमहाल, इटलीचा पिसा, पॅरिसचे आयफेल टॉवर, अमेरिकेचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तशीच महत्त्वाची ही ‘सग्राडा’ फॅमिलिया (Sagrada Familia ) वास्तू. प्रत्येकाच्या आवड आणि निरिक्षणानुसार ही पर्यटनाची यादी बदलू शकते. मला आवडलेल्या अनेक वास्तूंच्या यादीत सग्राडाचा क्रमांक बराच वरचा येतो. तुम्हाला या लेखातून आणि फोटोंमधून ही वास्तू कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.

  • ज्योती भालेराव

Leave a Reply

Unique Architecture in Barcelona: Sagrada Familia – ( Construction Period – 1882 to 2026 )