Translate :

Sponsored

Tukaram Munde Action, Big News, 2026 : तुकाराम मुंढे यांची नजर आता मेडिकल व्यवसायीकांवर, परवाने होऊ शकतात रद्द : Tukaram Mundhe Medical Stores Banned From Forcing Customers To Bye Full Medicines Stripes Or Packets

तुकाराम मुंढे यांची नजर आता मेडिकल व्यवसायीकांवर, परवाने होऊ शकतात रद्द .

Tukaram Munde Action : गेले काही महिने महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिक आणि दूध व्यावसायिकांसाठी कठिण जात आहेत. कारण अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चालवलेल्या कारवाईच्या सत्रामुळे सर्व व्यावसायिक टेन्शनमध्ये आहेत. यात आता मेडिकल चालवणाऱ्यांचाही समावेश झाला आहे. कारण आता आपल्या कारवाईचा मोर्चा त्यांनी इकडे वळवला आहे.

मुंबई : 11-08-2026

महाराष्ट्रातील नामांकित रेस्टॉरंटस आणि ह़ॉटेल्सवर कारवाई केल्यामुळे सध्या राज्यात तुकाराम मुंढे  (Tukaram Munde Action) या नावाची चर्चा आहे. आता मात्र मुंढे यांनी आपल्या कारवाईचा मोर्चा मेडिकल स्टोअर्सकडे वळवला आहे.

जेव्हा आपल्याला स्पष्ट शब्दात लिहून देतात की तुम्हाला एकच गोळी खाण्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही मेडिकल स्टोअरला जाऊन एक गोळी खरेदी करतात. पण मेडिकल स्टोअरमधील व्यक्ती कधी कधी तुम्हाला स्ट्रिप देण्याचा प्रयत्न करते. यामुळे एकतर गोळ्या वाया जातात आणि तुम्हाला अतिरिक्त पैसेही मोजावे लागतात.

काय आहे निर्णय ? (Tukaram Munde Action)

आता यावर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना गरजेपेक्षा जास्त औषध कऱण्यास भाग पाडणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर आता कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मेडिकल स्टोअर चालक आणि फार्मासिस्टना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

एखाद्या औषधाच्या स्ट्रिपमध्ये दहा गोळ्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णाला त्यापैकी केवळ पाच गोळ्याची आवश्यकता असेल, तर ग्राहकाला संपूर्ण स्ट्रिप खरेदी कऱण्याती सक्ती करता येणार नाही. आवश्यक तेवढ्यात गोळ्या देणे अपेक्षित आहे. ग्राहकाला गरजेपेक्षा जास्त औषध घेण्यास भाग पाडल्याचे आढळ्यास संबंधित मेडिकल स्टोअरवर कारवाई होऊ शकते.

गंभीर प्रकरण असेल तर औषध विक्रिचा परवाना रद्द कऱण्याचीही कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकारची सक्ती झाल्यास ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी 1800-222-365 हा हेल्पलाईन क्रमांक तसेच complints.mahafda.in या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारींची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ग्राहकांना आवश्यक तेवढीच औषधे खरेदी कऱण्याचा अधिकार अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored