Translate :

Sponsored

Sonam Wangchuk Hunger Strike, Big News, 2026 : उपोषण सोडण्यास सोनम वांगचूक तयार, मात्र ठेवल्या या तीन अटी ! : Delhi Jantar Mantar Protest Sonam Wangchunk Announces To End Hunger Strike On Three Conditions

उपोषण सोडण्यास सोनम वांगचूक तयार, मात्र ठेवल्या या तीन अटी !

Sonam Wangchuk Hunger Strike : दिल्ली प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. आदेशानुसार, जंतर-मंतर येथील अधिकृत आंदोलनस्थळ वगळता इतर ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चे काढणे किंवा निर्दशने करण्यास मानाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोनम वांगचूक हे 20 जुलैला उपोषण सोडणार आहेत,मात्र त्यांनी सरकारपुढे तीन अटी ठेवल्या आहेत.

दिल्ली : 20-07-2026

सोनम वांगचूक ( Sonam Wangchuk Hunger Strike) यांनी आज 20 जूलैला उपोषण सोडणार आहेत. सोनम वांगचूक यांनी पत्रात म्हटले आहे की, ” प्रिय मित्र आणि सहकारी, तुम्हांंपैकी अनेकांनी मला माझे उपोषण कधी संपवणार, असा प्रश्न विचारला आहे. यापूर्वी समर्थकांना दिलेल्या माहितीनुसार, मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवणार आहे.”

काय आहेत वांगचुक यांच्या तीन अटी ? ( Sonam Wangchuk Hunger Strike)

  • 1 सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची, विशेषतः पेपरफुटीच्या घटनांची जबाबदारी स्वीकारावी.
  • 2 मी आणि सीजेपीचे (CJP) नेतृत्व संसदेत पोहोचल्यानंतर विविध पक्षांचे खासदार आणि नेते हा मुद्दा संसदेत उपस्थित कऱण्याचे आश्वासन द्यावे.
  • 3 जर प्रकृती किंवा इतर कारणांमुळे संसदेत जाणे शक्य झाले नाही, तर विविध पक्षांचे खासदार आणि नेते रूग्णालयात येऊन वरील आश्वासने द्यावीत.
  • पत्राच्या शेवटी वांगचुक यांनी, “सफदरजंग रूग्णालयातील बेकायदेशीर नजरकैदेत असून माझ्या हालचाली, अभिव्यक्ती आणि संवादाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.” असेही म्हटले आहे.

जंतर-मंतर आंदोलन कायम ( Sonam Wangchuk Hunger Strike)

जंतर मंतरवरील आंदोलन अद्याप सुरू असून, आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडस हटवण्यात आले आहेत. संसदेचे पावसाठी अधिवेशन सुरू होत असल्याने दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

रूग्णालयात दाखल झाल्यानंतर आंदोलनाला नवे वळण ( Sonam Wangchuk Hunger Strike)

उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यानंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सीजेपीचे संस्थापक  अभिजित दीपके यांनीही उपोषण सुरू केले आहे. सीजेपीचा आज (20 जुलै) रोजी संसदेकडे मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिल्लीत निर्बंध लागू ( Sonam Wangchuk Hunger Strike)

दिल्ली प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आदेशानुसार, जंतर-मंतर येथील अधिकृत आंदोलनस्थळ वगळता इतर ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चे काढणे किंवा निर्दशने करण्यात मनाई करण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन लक्षात घेऊन सार्वजनिक सुरक्षा आणि शासकीय आस्थापनांच्या संरक्षणासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात कऱण्यात आली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored