Translate :

Sponsored

Sonam Wangchuk Message, Big News,2026 : रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचे आवाहन, 20 जुलैला काय होणार ? : Sonam Wangchuk First Message From Hospital Calls Second Movement For Freedom 20 July Parliment March

रुग्णालयातून सोनम वांगचूक यांचे आवाहन, 20 जुलैला काय होणार ?

Sonam Wangchuk Message : सोनम वांगचूक यांनी सलग 21 दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. असे डॉक्टरांच्या निर्दशनास आल्यामुळे त्यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून थेट सफदरजंग रूग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी आता रूग्णालयातून एक आवाहन केले.

दिल्ली : 19-07-2026 

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk Message) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सलग अनेक दिवस अन्नत्याग केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने प्रशासनाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवेल, मात्र, रूग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला असून आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.

सलग 21 दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृतीत बिघाड (Sonam Wangchuk Message)

सलग 21 दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. त्यानंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना जंतर -मंतरवरून थेट सफदरजंग रूग्णालयात नेले. सध्या डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवरून बारकाईने लक्ष ठेवून आहे.

डॉक्टरांनी वांगचूक यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे, मात्र आंदोलनाची भूमिका बदलण्यास ते तयार नसल्याचे समोर आले आहे.

रूग्णालयातूनही वांगचूक यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश (Sonam Wangchuk Message)

रूग्णालयातूनही वांगचूक यांनी आपल्या समर्थकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिला. त्यांनी 20 जुलैचा उल्लेख करत या दिवसाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. देशात अन्याय आणि भीतीविरूद्ध जनतेने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.

20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याते आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे. त्यांच्या मते, लोकशाहीत नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपला आवाज बंद करणे आवश्यक आहे.

दरम्यान, सफदरजंग रूग्णालयाकडून त्यांच्या आरोग्याबाबत माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांची जीवनावश्यक चिन्हे स्थिर आहेत. मात्र दिर्घ उपोषणामुळे शरीरातील काही घटकांमध्ये बदल दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना सतत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

वांगचूक त्यांची प्रकृती नाजूक (Sonam Wangchuk Message)

रूग्णालयातील तज्ञ ड़ॉक्टरांचे पथक रक्त तपासण्या, ह्रदयाती स्थिती आणि इतर आवश्यक तपासण्यांवर नियमित लक्ष ठेवत आहे. कोणतीही अचानक गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून 24 तास निरीक्षण सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हे आंदोलन सुरू होण्यामागे काही महत्त्वाच्या मागण्या असल्याचे सांगितले जात आहे. विविध शैक्षणिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वांगचुक यांनी उपोषणाचा मार्ग स्विकारला. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते आणि काही कलाकारांनाही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

रूग्णालयात हलवण्याच्या निर्णयावरही विविध प्रतिक्रिया (Sonam Wangchuk Message)

त्यांना रूग्णालयात हलवण्याच्या निर्णयावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींना हा निर्णय त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.

रूग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदललेली नाही आणि आपल्या मागण्यांसाठी ते अजूनही ठाम आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored