Translate :

Sponsored

Sonam Wangchuk Health Update, Big News, 2026 : सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद समोर, पत्नीने थेट उच्च न्यायालयात : Sonam Wangchuk Removed From Jantar Mantar And Taken To Hospital By Delhi Police Cjp Creates An Upror

सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीवरून नवा वाद समोर, पत्नीने थेट उच्च न्यायालयात.

Sonam Wangchuk Health Update : वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगेमी यांनी सांगितले की, कुटुंबाला आपल्या आवडीच्या रूग्णालयात दाखल करण्याचा अधिकार असायला हवा. पण सध्या त्यांना हा निर्णय घेऊ दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली : 19-07-2026

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk Health Update) यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत असताना त्यांच्या पत्नीने मोठे पाऊल उचलले आहे. सफदरजंग रूग्णालयाऐवजी दुसऱ्या रूग्णालयात उपचार कऱण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. आपल्या पतीच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करायची नसल्याती त्यांनी स्पष्ट केले आहे. वांगचूक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या कुटुंबाला या उपचारपद्धतीबाबत समाधान नसल्याचे आता समोर आले आहे.

वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांचा आरोप (Sonam Wangchuk Health Update)

वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे.आंगमो यांनी सांगितले की, कुटुंबाला आपल्या आवडीच्या रूग्णालयात दाखल कऱण्याचा अधिकार असायला हवा. पण सध्या त्यांना हा निर्णय घेऊ दिला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच त्यांनी न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेक गंभीर मुद्द उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, रूग्णालयाकडून प्रसिद्ध कऱण्यात आलेल्या आरोग्य अहवालात काही महत्त्वाची वैद्यकीय माहिती पूर्णपणे नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुटुंबाच्या मनात शंका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यास किंवा डिस्टार्ज देण्यास नकार (Sonam Wangchuk Health Update)

वारंवार विनंती करूनही वांगचूक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास किंवा डिस्टार्ज देण्यास परवनागी मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, उपचारांपेक्षा निर्बंध अधिक जाणवत आहे. त्यांनी असा दावा केला की, ज्या मजल्यावर वांगचूक यांच्यावर उपचार सुरू आहेत, तेथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. रूग्णालयात येण्या-जाण्यावरही अनेक मर्यादा असल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे ही परिस्थिती सामान्य वैद्यकीय उपचारांसारखी वाटत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी (Sonam Wangchuk Health Update)

याच कारणामुळे त्यांनी न्यायलयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. वांगचूक यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होण्यापूर्वी त्यांना पसंतीच्या खासगी रूग्णालयात हलवण्यास परवानगी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, वांगचूक यांचे उपोषण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित काही गंभीर प्रश्न आणि परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी अन्नत्यागाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या आंदोलनामुळे देशभरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

देशभरातील मान्यवरांचे लक्ष (Sonam Wangchuk Health Update)

उपोषणाचा कालावधी वाढत गेल्यानंतर त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र या निर्णयानंतरही वाद थांबलेला नाही. त्यांच्या समर्थकांकडून तसेच कुटुंबीयांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या सर्वांचे लक्ष उच्च न्यायलयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. न्यायालयाने परवनागी दिल्यास वांगचूक यांना खासगी रूग्णालयात हलवले जाऊ शकते. तोपर्यंत त्यांच्यावर सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत. वांगचूक यांच्या प्रकृतीसोबतच त्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored