Translate :

Sponsored

RTO Officer Suicide, Shocking News, 2026 : राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी.. निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचे धक्कादायक पाऊल : Nashik Retired RTO Officer Suicide Gunshot City Center Mall

राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी.. निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचे धक्कादायक पाऊल

RTO Officer Suicide : सिटी सेंटर मॉल परिसरात गोळीबाराछ्या आवाजाने उडाली खळबळ ! निवृत्त सहाय्यक RTO अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. अद्याप कारण समजू शकले नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे.

नाशिक : 20-11-2026 

नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक उघडकी. मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याचा प्रकार घडला आङे. सिटी सेंटर मॉल परिसरातील राहत्या घरात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे नाशिक शहरातील प्रशासकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राहत्या घरात गोळी झाडून संपवले आयुष्य  (RTO Officer Suicide)

निवृत्त सहाय्यक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे हे नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी राहत्या घरातच स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. घरातून गोळीबाराचा आवाज येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.

अनेक तर्कवितर्क  सुरू (RTO Officer Suicide)

हेमंत हेमाडे यांनी या टोकाचा निर्णय नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट किंवा इतर कोणताही महत्त्वाचा ऐवज मिळाला का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील निवृत्त अधिकाऱ्यांना अशाप्रकारे जीवन संपवल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored