Translate :

Sponsored

Raju Shetti Farmers News, Big News, 2026 : राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू, राजू शेट्टी यांनी बदलली आंदोलनाची दिशा, कृष्णा साखर कारखान्यावर आजपासून काटा बंद आंदोलन सुरू

राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू, राजू शेट्टी यांनी बदलली आंदोलनाची दिशा, कृष्णा साखर कारखान्यावर आजपासून काटा बंद आंदोलन सुरू

Raju Shetti Farmers News : राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमधून ऊसाला प्रति दर 5 हजार 500 दर मिळावा अशी मागणी केली आहे. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कोगनोळी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.

कराड : 15-10-2026 

राज्यात आजपासून (15 ऑक्टोबर) ऊस गळीत (Raju Shetti Farmers News)  हंगाम सुरू होणार आहे. मात्र, शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्ये संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाची दिशा बदलत आता साखर कारखाने बंद करणार असल्याचा इशारा दिला. आज कृष्णा साखर कारखाना रेठरे (कराड) येथे काटा बंद आंदोलन कऱणार असल्याची घोषणा केली आहे. राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेमधून ऊसाला प्रति तर 5 हजार 500 दर मिळावा अशी मागणी केली आहे.

यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कोगनोळी टोल नाक्यावर अभूतपूर्व आंदोलन कऱण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो शेतकऱ्यांनी टोलनाक्यावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन केले.

राजू शेट्टींनी दराची मागणी का केली आहे ? (Raju Shetti Farmers News)

राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत 5 हजार 500 दर बाजापामध्ये साखरेचे दर वाढत असल्याने ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वाधिक एफआरपी देणारे राज्य असल्याचे म्हटले आहे. एफआरपी ही त्या-त्या भौगोलिक क्षेत्रातील ऊसाला पडलेल्या उताऱ्यावर अवलंबून असते.

सरकारने 2024-25 या वर्षी मूळ उताऱ्यासाठी 340 प्रतिक्विंटल म्हणजे प्रतिटन 3400 रुपये एफआरपी दिली होती. 2025-26 मध्ये त्यामध्ये 15 रुपयांची वाढ करत 355 प्रतिक्विंटल म्हणजे एफआरपी 3550 रुपये इतकी केली. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला उतारा जास्त पडतो त्यामुळे हा दर आणखी जास्त असतो. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा उतारा 11 ते 12 टक्क्यांपर्यंत पडतो.

मात्र यामधून साखर कारखानदार ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करून घेतात, त्यामुळे शेतकऱ्याला फारसा पैसा मिळत नाही. म्हणून राजू शेट्टी यांनी यावेळी प्रतिटन 5 हजार 500 रुपये मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.

कोठून होणार पदयात्रेला सुरूवात ? (Raju Shetti Farmers News)

सलग 31 तास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानंतर, प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपले महामार्गावरील ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, हा लढा संपलेला नसून तो थेट केंद्रीय मंत्र्यांच्या दारात नेण्याचा निर्णय झाला असल्याती माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

महामार्गावरील चक्काजाम मागे घेतल्यानंतर, कर्नाटक राज्य रयत संघाचे प्रमुख चुन्नाप्पा पुजारी यांनी बेळगावाजवळील हत्तरकी टोल नाका येथून पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानावर धडकणार आहे.

निर्णय न घेताच कारखाने सुरू का ? (Raju Shetti Farmers News)

आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांविरोधात राजू शेट्टी यांनी मोर्चा वळविला आहे. सातारच्या आणि सांगलीच्या काही कारखानदारांनी घाईघाईने गळीत हंगाम सुरू केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. राजू शेट्टी यांनी आरोप केला की, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तसेच ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला घाबरून शेतकऱ्यांच्या दराचा निर्णय न घेताच कारखाने सुरू केले आहेत.

या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी काटा बंद आंदोलन सुरू कऱण्यात येणार आहे. हे सर्व कारखाने बंद पाडून ऊसतोड रोखली जाणार आहे. आणि दोन दिवसांनंतर सर्व कार्यकर्ते हुबळी येथील पदयात्रेत सामील होतील. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या आंदोलनात कोगनोळी आणि हत्तरकी टोल नाक्यांवर हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यांवरच जेवण करून पंगती बसवल्या होत्या. यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या शेकडो किमी रांगा लागल्या.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored