Translate :

Sponsored

Farmer Loan News, Good News, 2026 : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, कर्जमाफीची प्रक्रिया होणार पूर्ण : Maharashtra Farmer Loan Waiver 4000 crore proposal Before Diwali

Farmer Loan News : दिवाळीच्या काही आठवडेपूर्वी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कर्जमाफी योजनेसाठी एकूण 13 हजार 275 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी हे बरेच सहाय्यक ठरणार आहे. आता भर दूष्काळामध्ये शेतकऱ्यांना थोडातरी आधार मिळणार आहे.

मुंबई : 27-10-2026

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी जरातरी आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी सुमारे 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी सहकार खात्याने 4 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त खात्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने आतापर्यंत कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण 25 लाख शेतकऱ्यांपैकी 15 लाख 85 हजार 493 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.

किती लाख शेतकऱ्यांना झाला फायदा  (Farmer Loan News)

मराठवाड्यातील सुमारे 6 लाख 27 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. शासनाने आजवर कर्जमाफी योजनेसाठी एकूण 13 हजार 275 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे. शासनाने आजवर कर्जमाफी योजनेसाठी एकूण 13 हजार 275 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

कर्जमाफीसाठी अर्ज करूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. आता अशा शेतकऱ्यांसाठीही सुवर्णसंधी आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पण अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्यापही सुमारे 4 लाख 82 हजार शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया बाकी असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कऱण्यात येत आहे.

शासनाने यावेळी दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सहकार आणि वित्त खात्याच्या समन्वयाने हा प्रस्ताव सादर झाला असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीपणाचा भार कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना पुढील शेतीकामासाठी नवीन प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कुठे संपर्क करावा  (Farmer Loan News)

शेतकऱ्यांनी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आपली स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवाळीच्या सणापूर्वी ही मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना बरीच मदत होणार आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored