History of April Fool’s Day – (1 st April)

April Fool

एप्रिल फुल डेचा इतिहास  – ( १ एप्रिल  )

जगात अशा अनेक प्रथा, परंपरा असतात की त्याच्यामागे काही विशेष कारणं नसतात, फक्त थोडी फार मजा, आनंद मिळावा हाच हेतू ती प्रथा पाळण्यामागे असतो. भारतात जसा होळी, रंगपंचमी हा दिवस, प्राचीन रोममधील हिलेरिया असे काही सण म्हणता येईल. अशीच एक गंमतीशीर पद्धत आहे ‘एप्रिल फुल दिवस’  (April Fool’s Day).

जगभरातील अनेक देश एक एप्रिलला एकमेकांना ‘मूर्ख’ बनवत थोडी मज्जा करताना दिसतात. काय आहे या एकमेकांना ‘फुल’ (April Fool’s Day) बनवणाऱ्या दिवसाचा इतिहास ?

एप्रिल फुल दिवसाचा (April Fool’s Day) इतिहास

बहुतेक देशांमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फुल डे (April Fool’s Day) साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना ठरवून गंमतीत फसवणं, त्यातून विनोद निर्मीती करणं असं काहीबाही केलं जातं. त्यावरून या दिवसाला एप्रिल फुल दिवस (April Fool’s Day) असे म्हटले जाते.

इंग्रजीत Fool (फुल) म्हणजे मूर्ख असा याचा अर्थ होतो. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणजे एप्रिल फुल दिवस.   या दिवसाच्या या प्रथेला नक्की कधी सुरूवात झाली हे मात्र सांगता येत नाही. ही प्रथा शतकानुशतकं सुरू आहे.  या प्रथेची उत्पत्ती फ्रान्समध्ये झाल्याचे सांगण्यात येते.

एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फरक आहे. परंतु सर्वांमध्ये एक समान धागा आहे, ज्यामुळे एखाद्याला मूर्ख बनवता येते. फ्रान्समध्ये मूर्ख बनवलेल्या व्यक्तीला ‘पॉईसन डी एव्हरिल’ म्हणजे एप्रिल फिश असे म्हणतात. जसं की छाटा मासा कोणाच्याही जाळ्यात अडकतो तसा हा मूर्ख माणूस असा त्याचा अर्थ होतो. फ्रान्समध्ये मुलं आपल्या मित्राला मूर्ख बनवून, विनोद निर्मीती करून त्याच्या पाठीवर कागदी मासा चिटकवतात.

स्कॉटलंडमध्ये हा (April Fool’s Day)  दिवस गोकी डे म्हणून ओळखतात. गोकी किंवा कोकीळा. मूर्ख आणि कुकल्डचे प्रतीक आहे. या दिवशी मुलं एकमेकांच्या पाठीवर ‘मला लाथ मारा’ असे लिहिलेले फलक मित्रांच्या पाठीवर चिकटवतात. अनेक देशांमध्ये वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमे सहभागी होतात. उदाहरणार्थ एखादी मोठी, अशक्य वाटणारी घटना बातमी म्हणून, मथळा देऊन प्रसारित केली जाते. हे प्रसारित केलेले वृत्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केलेले असते. एखाद्या घटनेचे विडंबन करूनही असे प्रकार एप्रिल फुलच्या (April Fool’s Day)  दिवशी केले जातात.

एप्रिल फुलचे (April Fool’s Day)  काही लोकप्रिय प्रँक –

बऱ्याचदा एप्रिल फुलच्या दिवशी करण्यात येणारा प्रँक म्हणजे क्रिमच्या बिस्किटातील क्रीम काढून घेऊन त्यात दुसरी एखादी क्रीम भरून ती खायला देणे. खाण्याच्या पदार्थात असेच काहीतरी गंमतीशीर बदल करून समोरच्याची फजिती केली जाते. जसे की साखरे च्या एवजी मीठ बदलणे इत्यादी. किंवा कोणीतरी घाईने येऊन तुला बोलावलयं असं सांगून कुठेतरी पाठवणे आणि तिथे कोणीच न जाऊन फजिती करणे हाही एक लोकप्रिय एप्रिल फुल प्रँक आहे.

विविध देशांमधे कसा साजरा करतात एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  

युनायटेड किंग्डम –

युके मध्ये एप्रिल फुलचा (April Fool’s Day)  प्रँक करून, जोरात एप्रिल फुल म्हणत ओरडतात. युनायटेड किंग्डममध्ये एक एप्रिलच्या दुपारनंतर एप्रिल फुल बनवण्याचा प्रँक करू शकत नाही. तसे कोणी केले तर प्रँक करणाराच एप्रिल फुल म्हणून समजला जातो.

स्कॉटलँड –

स्कॉटलँडमध्ये एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  ला ‘हंटिगॉक डे’ असे म्हणतात. हंट द गॉक या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. यादिवशी येथे एक खेळ खेळला जातो, ज्यात एकमेंकांना बंद पाकिटात काही संदेश पाठवले जातात.

इटली, फ्रान्स, बेल्जियम आणि फ्रेंच भाषिक देशांमध्ये –

इटली, फ्रान्स,बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि कॅनडाच्या फ्रेंच भाषिक क्षेत्रांमध्ये १ एप्रिलची (April Fool’s Day) परंपरा एप्रिल फिश म्हणून पाळतात. जसे की, फ्रेंच मध्ये पॉईसन डी एव्हरिल, डचमध्ये एप्रिलविस आणि इटलीमध्ये पेसे डी एप्रिल म्हणून ओळखली जाते. येथे कागदी मासा ज्याला एप्रिल फुल बनवायचे आहे, त्याच्या पाठीला नकळतपणे जोडण्याचा प्रयत्न केला जातो. १९ व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच एप्रिल फुल डे पोस्टकार्डावर अशा माशांचे चित्र आढळून येते.

नॉर्डिक देश –

डेन्स, फिन्स,आईसलँडर्स, नॉर्वेजियन आणि स्विडिश या देशांमध्ये एप्रिल फुल डे (April Fool’s Day) साजरा केला जातो. या देशांमधील सर्व वृत्तपत्रे शक्यतो एकच खोटी बातमी प्रसारित करतात. हि बातमी म्हणजे पहिल्यापानावरील लेख असतो, मात्र या बातमीला शिर्षक दिलेले नसते. असे करून लोकांना एकाचवेळी एप्रिल फुल बनवण्याचा प्रयत्न केला जातो.

पोलंड –

पोलंडमध्ये या दिवसाला प्राइमा एप्रिलिस (लॅटिनमध्ये पहिला दिवस) असे म्हणतात. हा दिवस (April Fool’s Day)  विनोदांचा दिवस म्हणून साजरा करतात. त्यांच्याकडेही ही शतकानुशतकं चालणारी ही परंपरा आहे. येथेही माध्यमे, एखाद्या संस्था किंवा लोकं एकमेंकांना खोटं सांगून मजा करतात. त्यात फार गंभिर गोष्ट केली जाणार नाही याची काळजी घेतली जाते. एक एप्रिलच्या दुपारनंतर प्राइमा एप्रिल विनोद उचित मानले जात नाहीत.

स्पॅनिश भाषिक देश –

अनेक स्पॅनिश भाषिक देशांमध्ये आणि फिलिपिन्समध्ये दिया दे लॉस सँटोस इनोसेन्टेस म्हणजे याचा अर्थ पवित्र निर्दोषांचा दिवस म्हणून हा एक उत्सव एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  सारखाच साजरा केला जातो. मात्र हा उत्सव डिसेंबरच्या अखेरिस साजरा केला जातो. मात्र एप्रिल फूल डे (April Fool’s Day)  देखिल काही प्रमाणात साजरा केला जातो. येथे एक पारंपरिक म्हण आहे, ज्यात असे म्हटले आहे की या दिवशी गाढवे जिथे जाऊ नये तिथे जातात.

तुर्की –

तुर्की किंवा टर्की येथेही एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  साजरा होतो. इतर अनेक देशांप्रमाणेच येथेही विनोद निर्मीती, प्रँक केले जातात, आणि एखादा त्यातून बकरा बनला तर ‘ बिर निसान, बिर निसान’म्हणजे एप्रिल फुल एप्रिल फुल असे ओरडले जाते.

युक्रेन –

या देशात एप्रिल फुल डे (April Fool’s Day) जरा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ओडेसा मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. त्याला स्थानिक भाषेत ह्युमोरिना असे म्हटले जाते. एप्रिल फूल डे (April Fool’s Day)  चे वर्णन येथे जगभरातील खोटे असे बोलले जाते. या उत्सवासाठी शहराच्या मध्यभागी एक मोठी परेड, संगीत मैफिली, मेळे आणि विविध कलांचे सादरिकरण केले जाते.

या महोत्सवासाठी मुलंमुली  विविध पोषाख परिधान करून शहरात फिरतात आणि त्याद्वारे लोकांना मूर्ख बनवून एप्रिल फूल डे साजरा करतात. या ठिकाणची आणखी एक मजेशीर पद्धत म्हणजे मुख्य शहरातील स्मारकाला मजेशीर कपडे घालून सजवले जाते. ह्यमेरिनाकडे यासाठी स्वतःचा लोगोसुद्धा आहे. महोत्सवादरम्यान विशेष लोगो छापलेले स्मृतिचिन्हे छापले जातात.

येथे २०१० पासून आंतरराष्ट्रिय जोकर महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही महोत्सव एकत्रच साजरे केले जातात.

इराण –

इराणमध्ये याला दोरूघ-ए सिझदाह (April Fool’s Day) म्हणतात आणि लोकं आणि माध्यमं १३ फरवर्दिन ला विनोद निर्मिती करतात जसे इतरदेशांमध्ये एक एप्रिलला करतात. ही एक परंपरा आहे, जी पर्शियन नवीन वर्ष नौरोजच्या १३ दिवसांनी साजरी केली जाते. यादिवशी लोकं घराबाहेर पडून उद्यानांमध्ये भेटून मजा करतात. ५३६ इसापूर्व काळापासून विनोदनिर्मितीची ही प्रथा पाळली जात आहे.

याशिवाय जर्मनी, अमेरिका, भारत अशा अनेक व्यापक देशांमध्येही एप्रिल फुल डे (April Fool’s Day)  ची प्रथा सारख्याच पद्धतीने पाळली जात असल्याचे पहायला मिळते.

रोजच्या धकाधकिच्या, ताणतणावाच्या दैनंदिन जीवनात एखादा दिवस थोडा मजेत घालवावा इतकाच या दिवसाचा उद्देश दिसतो. आपण प्रत्येक धर्मात अनेक सण-उत्सव साजरे करत असतो. मात्र बऱ्याचदा त्यात देव-धार्मिक भावना जास्त असते. एप्रिल फूल डे (April Fool’s Day)  हा एक असा उत्सव आहे जिथे कुठलाही धर्माचे पालन नसून फक्त मज्जा करण्याचा हेतू असावा. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना एप्रिल फुल दिवसाच्या शुभेच्छा ..

  • ज्योती भालेराव  

Leave a Reply

Share the Post:

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!