प्रत्येक देशाची ओळख ही त्या देशाची भाषा आणि खाद्यसंस्कृती यातून जगाला होत असते. जगात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती बघायला मिळते. त्यातील शाकाहारींना प्रथिनांचे महत्त्व समजावे, प्रथिनांमध्ये कडधान्यांना किती महत्त्व आहे हे कळावे, यासाठी दरवर्षी १० फेब्रुवारीला ‘जागतिक कडधान्य दिवस’ (World pulses day) साजरा केला जातो. चला तर मग, मिसलेनियस वर्ल्डच्या या भागात आपण या जागतिक कडधान्य दिवसाविषयीची माहिती घेऊ.
जागतिक कडधान्य दिवसाचा ( World pulses day) इतिहास –
पहिला जागतिक कडधान्य दिवस २०१६ ( World pulses day) च्या १० फेब्रवारीला साजरा करण्यात आला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सभेने १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येईल असे ठरवले. कडधान्य आणि डाळी यांचे महत्त्व जनसामान्यांमध्ये वाढावे, त्याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी म्हणून हा दिवस साजरा करण्यात यावा ही त्यामागची भूमिका होती.
अन्न आणि कृषी संघटना यांच्या द्वारे या दिवसाचे आयोजन करण्यात संपूर्ण जगभर करण्यात येऊ लागले. २०१६ पासून जनसामान्यांमध्ये कडधान्यांविषयीचे महत्त्व, पौष्टिक मूल्य आणि पर्यावरणीय महत्त्व याबद्दल शिक्षित करण्यासाठी या जागतिक व्यासपिठाचा वापर होत आहे.
कडधान्य म्हणजे आहारातील शक्तिस्थान – कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे ते आपल्या संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.म्हणून आहारात त्यांचे महत्त्व फार आहे. कडधान्य पिकवण्याचे फायदे – इतर पिकांपेक्षा कडधान्य पिकवण्यासाठी कमी पाणी लागते. त्याचबरोबर कडधान्यांच्या पिकांमुळे जमिनीतील नायट्रोजनचे योग्य प्रमाण राखले जाते आणि जमीनीची सुपीकता वाढते.
अन्न सुरक्षा – कडधान्य हा पिकांमधील असा प्रकार आहे, ज्यामुळे अनेकांची भूक सहजरित्या आणि पौष्टिक मूल्यांमध्ये कोणतीही कमतरता न रहाता भागवली जाते. कडधान्यांचे पीकं घेणे आणि ते वाढवणे हे अनेकदा इतर पिकांपेक्षा परवडणारे असते. त्यामुळेत गरीब, सामान्य जनतेला परवडणारे असे हे अन्न आहे. कडधान्यांच्या पौष्टिकतेसह किफायतेशिर किंमतींमुळे, जागतिक भूक भागवण्यामध्ये डाळींचा वाटा मोठा आहे.
जैवविविधता – कडधान्यांच्या पिकांच्या शेतीमुळे इतर पिकांच्या लागवडीसाठी त्यांचा फायदा होतो. कडधान्यामुळे जमिनीचा कस सुधारत असल्याने त्यांच्या पिकांमुळे इतर पिकांच्या उत्पादनांसाठी ते फायदेशीर आहेत.
२०२५ या वर्षाची जागतिक कडधान्य दिवसाची थिम – ( World pulses day)
‘कडधान्ये – कृषी खाद्य प्रणालींमध्ये विविधता आणणे’ , ही यावर्षीची थिम आहे. वैविध्यपूर्ण आणि शाश्वत अन्न प्रणालींमध्ये कडधान्यांच्या योगदानावर भर देण्यासाठी ही थिम ठरवण्यात आली आहे. आरोग्यदायी आहार आणि आरोग्यदायी जगासाठी कडधान्यांवर प्रेम करा हे घोषवाक्य मानवी कल्याण आणि पर्यावरणीय आरोग्यासाठी दुहेरी भूमिका अधोरेखित करते.
कसा साजरा केला जातो हा ( World pulses day) दिवस ?
विविध कृषी संस्था किंवा शासनातर्फे कार्यक्रम आखले जातात.
- पोषण जागरूकता मोहिमा – डाळींचे आरोग्य फायदे विषद करणारे कार्यक्रम –
- परस्परसंवादी खेळ – जसे की डाळींविषयी प्रश्नमंजुषा आणि खेळ आयोजित केले जातात.
- इको फ्रेंडली कार्यशाळा – कडधान्ये शाश्वत शेतीला कशी फायदेशीर आहेत यांसारख्या मुद्यांवर कार्यशाळा आयोजित केली जाते.
- सोशल मीडिया आव्हाने – हॅशटॅग वापरून लोकांना त्यांच्या आवडीचे डाळींचे पदार्थ पोस्ट करायला प्रोत्साहित केले जाते.
- फार्म टूर – आभ्यागतांना डाळींच्या शेतीच्या पद्धतीची ओळख करून दिली जाते.
- सामुदायिक बागकाम प्रकल्प – सहभागिंना घरी कडधान्ये पिकवायला शिकवतात.
- डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग – अन्न सुरक्षा आणि शाश्वतता याविषयीचे माहितीपट दाखवले जातात.
- कडधान्यांचे वाटप – वंचित, कुपोषित समुहांना कडधान्यांचे वाटप करून त्यांना डाळींच्या पोषकतेचे महत्त्व पटवून दिले जाते.
अशा विविध प्रकारांनी जागतिक कडधान्य दिवस ( World pulses day) साजरा केला जातो. आज विकसित देशांमध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाची समस्या लहान मोठे सगळ्यांमध्ये जास्तप्रमाणात वाढताना दिसून येते. मैद्यापासून बनवण्यात आलेल पदार्थ, फास्टफूड, जंकफूड यांच्या अतिप्रमाणातील सेवनाने या समस्या वाढत आहेत.
त्यासाठी आपल्या आहारातील हे प्रमाण कमी करून विविध कडधान्य जसे की मसूर, चणे, सोयाबीन, वटाणे अशा अनेक कडधान्यांपासून विविध प्रकारच्या पाककृती बनवून तरूण पीढीला त्यांची सवय करणे आवश्यक बनले आहे. यातून तरूण पिढीच्या आरोग्यासह जगातील जमिनींचे आरोग्यही सुधारले जाणार आहे. शेती आणि आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर कडधान्यांचे महत्त्व आहे. त्यासाठीच ‘जागतिक कडधान्य दिवस’ ( World pulses day) साजरा करण्याला आज घडीला महत्त्व आहे.
- ज्योती भालेराव
2 thoughts on “World Pulses Day – Since 10 February 2016 !”
“I agree with your points, very insightful!”
“Your writing style is engaging and clear, love it!”