Somnath Amrit Mahotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होत मंदिरात विधिवत पूजा केली. यावेळी 11 पवित्र तीर्थांच्या जलाने कुंभाभिषेक करण्यात आला.
गुजरात : 11-05-2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ (Somnath Amrit Mahotsav) कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक कऱण्यात आला.
या अभिषेकासाठी एका विशेष कलशाचा वापर कऱण्यात आला. या सोहळ्यादरम्यान, 11 तीर्थक्षेत्रांतील पवित्र पाणी मंदिराच्या 90 मीटर उंच कळसावर ओतण्यात आले. या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राज्यांतील कलाकार आणि दूरदूरच्या भागांतील प्रेक्षक आले होते.
सोमनाथ मंदिरातील सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एका रोड शोमध्ये भाग घेतला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्यमंत्री हर्ष संघवी हे उपस्थित होते.
मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर झालेल्या उद्धाटनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त या महोत्सवाचे आयोजन कऱण्यात आले आहे. ‘ विशेष महापूजा’, ‘कुंभाभिषेक’ आणि ‘ध्वजारोहण’ समारंभांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमादरम्यान ते एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित केले. हा कार्यक्रम मंदिराच्या पुनर्बांधणी आणि पुनर्प्रतिष्ठापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘सोमनाथ अमृत पर्व-2026’ मोहिमेचा एक भाग आहे.
कधी आयोजित केला होता हा कार्यक्रम ? (Somnath Amrit Mahotsav)
हा कार्यक्रम 8 ते 11 मे दरम्यान आयोजित केला गेला. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या ज्योर्तिर्लिंग मंदिराच्या पुनर्बांधणी 75 वा वर्धापनदिन साजरा कऱण्यासाठी हा चार दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमनाथ मंदिर हे सनातन वारशाच्या पुनरूज्जीवनाचे प्रतिक मानले जाते. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रस्तावानुसार त्याची पुनर्बांधणी कऱण्यात आली. आयोजकांच्या मते, पुनर्बांधणी झालेल्या सोमनाथ मंदिराच्या शिखरावर प्रथमच कुंभाभिषेक केला जाईल.
काय आहे हा विधी ? (Somnath Amrit Mahotsav)
हा विधी विशेषतः दक्षिण भारतातील मंदिरांशी संबंधित आहे आणि शुद्धीकरण सोहला म्हणून पारंपरिकरित्या दर 10 ते 12 वर्षांनी केला जातो. या विधीसाठी 1,100 लिटर क्षमतेचा एक विशेष कलश तयार कऱण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या कलशाचे वजन 760 किलोग्रॅम असून, पाण्याने भरल्यावर त्याचे वजन अंदाजे 1.86 मेट्रिक टन होईल. हा कलश आठ फूट उंच असून, त्यात 11 तीर्थक्षेत्रांतून आणलेले पवित्र पाणी ठेवले जाईल. मंदिर परिसराबाहेर तैनात असलेल्या 350 टन क्षमतेच्या ऑल-टेरेन क्रेनच्या साहाय्याने हा कलश मंदिराच्या शिखरावर उचलला जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिखराच्या 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी क्रेनचा बूम विशेषतः वाढवण्यात आला आहे.
This post was last modified on May 11, 2026 1:50 pm