Translate :

Sponsored

International Yoga Day 2026, Great Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस, जाणून घ्या भारतीय योग इतिहास आणि महत्त्व !

आंतरराष्ट्रीय योग दिवस, जाणून घ्या भारतीय योग इतिहास आणि महत्त्व ! ( फोटो संग्रहीत, सोशलमीडिया)

International Yoga Day 2026 : भारतासह अवघ्या जगभरात 21 जून हा दिवस, योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने सर्व जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे ‘भारतीय योग’ होय. या भागात आपण भारतीय योग, आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्याचा इतिहास आणि महत्त्व असे सर्व जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026, विशेष लेख  (International Yoga Day 2026)

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून ला दरवर्षी साजरा केला जातो. ‘योग’ ही जरी भारताने जगाला दिलेली देणगी असली आणि भारतात योग क्रिया ही पूर्वापार लोकं करत असले तरी, जगभरात योग दिवस असा विशेष दिन साजरा करण्याची ही प्रथा मात्र अलिकडील काळातील आहे.

कधी झाली आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरूवात ? (International Yoga Day 2026)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी 2014 मध्ये या दिनाची घोषणा केली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

21 जून या दिवसाची निवड का ? (International Yoga Day 2026)

हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो आणि त्याला प्राचीन भारतीय परंपरेत विशेष महत्त्व आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी 21 जून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

योग दिन साजरा कऱण्याचा उद्देश काय ? (International Yoga Day 2026)

आज जगभरातील लोकांना भारतीय योग, अध्यात्म आणि प्राणायम यांचे महत्त्व पटले आहे. योग केल्याने शारिरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना काय आहे ? (International Yoga Day 2026)

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योगदिन हा 12 योग दिन आहे. या वर्षीचा हा दिवस साजरा करण्यासाठीची संकल्पना आहे, ‘ निरोगी वृद्धत्वासाठी योग’ (Yoga For Healthy Aging).  वाढत्या वयानुसार दिर्घायुष्य, शारिरिक हालचालींची क्षमता, मानसिक कणखरपणा आणि सर्वांगीण आरोग्य जोपासण्यासाठी नियमित योगाभ्यासाची भूमिरा यावर ही संकल्पना जास्त भर देत आहे.

या वर्षीचा कार्यक्रम कलकत्ता येथे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी संस्कृती मंत्रालयातर्फे भारतातील 100 प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जर तुम्हालाही या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही मंत्रालयाच्या ‘ Ayush Yoga Sangam Portal ‘ वर रेजिस्ट्रेशन करू शकता. यावर्षीच्या योग दिनासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध व्यक्तींमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजार रोखण्यासाठी, या वर्षीच्या योगासने आणि दिनचर्येमध्ये शारिरिक ताकद, शरीराचा समतोल आणि सांध्यांचे आरोग्य या गोष्टींवर विशेष भर दिला जाणार आहे.

आज या लेखातून आपण भारतीय योग परंपरेचा इतिहास जाणून घेऊन (International Yoga Day 2026)

1.  पूर्व – वैदिक काळ (सिंधू संस्कृती – 5000 वर्षांपूर्वी )

सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या (उदा. हड्प्पा आणि मोहेंजोरडो) उत्खननात योगमुद्रेतील (पद्यासन) मूर्ती आणि मुद्रा सापडल्या आहेत. यावरून भारतात 5000 वर्षांपूर्वीही योगाचा सराव केला जात होता हे सिद्ध होते.

2. वैदिक काळ

ऋग्वेद संस्कृतमधील युज या धातूपासून ‘योग’ हा शब्द बनला आहे. ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकात्म कऱणे असा होतो. ऋग्वेदामध्ये योग आणि ध्यानाचा प्रथम उल्लेख आढळतो.

मंत्र आणि यज्ञ : या काळात ऋषीमुनी यज्ञ, प्रार्थना आणि ध्यानाच्या माध्यमातून योगसाधना करत असत.

3. उपनिषद आणि भग्वदगीता काळ

उपननिषद : वेदांमधील तत्त्वज्ञानाचा विस्तार उपनिषदांमध्ये झाला. यामध्ये आत्मज्ञान आणि मन-बुद्धीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

भग्वदगीता : यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला योगाचे सखोल ज्ञान दिले. यात प्रामुख्याने ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तीन मुख्य मार्गांचा समावेश आहे.

4. शास्रीय काळ

योगसूत्र : महर्षी पतंजलीने योगाचे जनक मानले जाते. त्यांनी वेदांत आणि उपनिषदांमध्ये विखुरलेल्या योगविद्येचे पद्धतशीर वर्गीकरण करून ‘योगसूत्र’ हा ग्रंथ लिहिला.

अष्टांग योग : मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा आठ पायऱ्या सांगितल्या आहेत.

5.  मध्ययुगीन काळ (हटयोग)

या काळात नाथ संप्रदायाचे संत जसे की गोरखनाथ, मस्त्येंद्रनाथ यांनी शारिरिक शुद्धी आणि दिर्घायुष्यासाठी हठयोगाचा विकास केला. हठयोग प्रदिपिका आणि घेरण्ड संहिता हे या काळातील प्रमुख ग्रंथ आहेत.

6. आधुनिक योग
स्वामी विवेकानंद : 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य देशात योग आणि राजयोगाचा प्रसार केला.

सध्याच्या आधुनिक काळात गेल्या दोन वर्षांपासून आंतराष्ट्रीय योग दिनाने एका चळवळीचे स्वरूप धारण केल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस जग व्यायामासाठी योग करत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याने योग च्या लोकप्रियतेते निश्चितच भर पडत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored