Translate :

Sponsored

Ketan Agrawal Death Pune, Shocking News, 2026 : केतन अग्रवालच्या मृत्यूचे कारण उलगडले, होणाऱ्या पत्नीनेच घेतला जीव, मित्रासह 8 जणांवर गुन्हा दाखल : Pune Ketan Agrawal Death Lohagad Treak Fiance Took Life

केतन अग्रवालच्या मृत्यूचे कारण उलगडले, होणाऱ्या पत्नीनेच घेतला जीव, मित्रासह 8 जणांवर गुन्हा दाखल.

Ketan Agrawal Death : लोहगाव किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सुरूवातीला ट्रेकिंग करताना पाय घसरून मृत्यू झाला असल्याचे भासवले गेले. मात्र आता होणाऱ्या पत्नीनेच केतनचा जीव घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : 23-06-2026 

लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून केतन अग्रवाल (Ketan Agrawal Death Pune) या तरूणाचा मृत्यू झाला होता. त्याचे लग्न अगदी तोंडावर आलेले असताना, हा मृत्यू सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला. मात्र आता या मृत्यू प्रकरणात आणखी एक भयंकर वळण आले आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपास असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात केतनची नियोजित वधू, तिचा मित्र आणि अन्य साथिदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अपघात नव्हे खून (Ketan Agrawal Death Pune)

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात मानला गेला होता. त्या दिवशी लोहगडावर जोरदार वारे वहात असल्याने केतनचा सेल्फी घेताना तोल जाऊन, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत, केतनच्या नियोजित वधूने पोलिसांसमोर कांगावा केला होता. मात्र सखोल पोलिस तपासात त्यांचा कट उघड झाला आहे.

वधूसह आठजण कटात सामील (Ketan Agrawal Death Pune)

तपासादरम्यान केतनची नियोजित वधू आणि तिच्या मित्रांनी मिळून त्याला दरीत ढकलण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या कटात एकूण आठ जणांना सहभाग असल्याचेही तपासातून स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे.

हे उघड झाल्यावर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी संबंधित आठ जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तक्रारीत त्यांनी नियोजित वधू आणि तिच्या आठ साथिदारांवर पूर्वनियोजित कट करून केतनला दरीत ढकलून दिल्याचा कट केल्याचा आरोप केला आहे.

पोलिस आता या प्रकऱणाचा तपास घातपात, कट करून खून करणे या वळणाने घेत आहेत.

उदयपूरमध्ये होणार होता अलिशान विवाह (Ketan Agrawal Death Pune)

केतन अग्रवाल याचा विवाह नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. त्यासाठी 14 कोटी रुपये खर्च करून कुटुंबियांनी एक अलिशान महालही बुक केला होता. शिवाय उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते.

केतनचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून , त्याच्या कुटुंबात वडिलांसह आई, बहिण असा परिवार आहे. केतनच्या पार्थिवावर निगडी येथे शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार कऱण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करण्यात आला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored