Translate :

Sponsored

NEET Paper Cheating Update, Big News, 2026 : नीट पेपरफुटी प्रकऱणात पाच जणांना अटक : NEET 2026 big update

नीट पेपरफुटी प्रकऱणात पाच जणांना अटक !

NEET Paper Cheating Update : नीट पेपर फुटीप्रकऱणात आतापर्यंत सीबीआयने एकूण पाच जणांना अटक केली आहे. एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक कऱण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे.

नाशिक  : 13-05-2026 

संपूर्ण देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी उत्सूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट (NEET) प्रवेश परीक्षा महत्त्वाची असते. मात्र या परीक्षेला पेपरफुटीचे (NEET Paper Cheating Update )शुक्लकाष्ट लागल्यामुळे सर्व विद्यार्थी चिंतेत आहे. तीन मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र पेपर लीक झाल्यामुळे आता सरकारने कारवाई करत, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे संपूर्ण देशभरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमधून देखील संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता पर्यंतच्या कारवाईत सीबीआयने पाच जणांना अटक केली आहे. अटक कऱण्यात आलेल्या पाच पैकी तीघे राजस्थान जयपूर येथील आहेत. तर एकजण महाराष्ट्रातील असून, एकाला हरियाणा राज्यातील गुरूग्राम येथून अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या नाशिक येथून नीट पेपर फुटीप्रकऱणात शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे. तर मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना राजस्थानमधील जयपूर येथून अटक कऱण्यात आली आहे. तर यश यादव नावाच्या व्यक्तीला हरियाणा येथील गुरूग्राममधून सीबीआयने अटक केली आहे. सरकारने या प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर नीट पेपर फुटी प्रकऱणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकऱणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातून एकाला अटक (NEET Paper Cheating Update )

या प्रकऱणात महाराष्ट्रातून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी शुभम खैरनार याच्या भावाला देखील सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भावेश खैरनार असं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सीबीआयकडून भावेश खैरनार याच्या घराची देखील झडती घेतली जाणार आहे, घराची झडती आणि चौकशीसाठी भावेश खैरनार याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला सोडलं जाणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांचा संताप (NEET Paper Cheating Update )

नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यानंतर घेण्यात आलेली परीक्षा रद्द ठऱवण्यात आली. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही संताप झाला आहे. आपल्या पाल्यासह, पालकही वर्षभर कष्ट करत होते. पेपर फुटल्याने वर्षभराची मेहनत वाया गेली असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे मुलं डिप्रेशन मध्ये जातील की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored