Translate :

Sponsored

NEET UG Exam Cancelled, Big News,2026 : नीट परीक्षा रद्द ; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय ; विद्यार्थांना परीक्षा परत द्यावी लागणार : NEET UG 2026 Exam Cancelled nTA Paper Leak CBI Invesstigation

नीट परीक्षा रद्द ; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय ; विद्यार्थांना परीक्षा परत द्यावी लागणार.

NEET UG Exam Cancelled : पेपरफुटीच्या तक्रारीनंतर NTA ने नीट युजी 2026 परीक्षा रद्द केली आहे. या प्रकऱणाचा तपास आता सीबीआय कऱणार असून, फेरपरीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. वाचा संपू्र्ण वृत्तांत.

दिल्ली : 12-05-2026 

यावर्षी नीट (NEET UG 2026 ) ची परीक्षा रद्द (NEET UG Exam Cancelled)  ठरवण्यात आली आहे. नुकतेच नीट युजी 2026 चा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आता या पेपरफुटी प्रकऱणाचा तपास सीबीआय (CBI) करणार आहे.

यंदा 3 मे रोजी नीट परीक्षेला 22 लाखांहून अधिक उमेद्वार बसले होते. आता पेपरफुटीच्या प्रकरणामपले NTA सर्व उमेद्वारांची परीक्षा पुन्हा घेणार आहे. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

राजस्थानमधून समोर आले होते पेपरफुटीचे प्रकरण (NEET UG Exam Cancelled)

नीटच्या पेपरफुटीचे प्रकरण राजस्थानमधील सीकर येथून समोर आले होते. राजस्थानमधील पोलिसांचे ‘SOG’ पथक या संपूर्ण प्रकऱणाचा तपास करत होते. सुरूवातीला पेपर लीक झालेला नाही, अशे मत या पथकाने मांडले. मात्र, नंतर मान्य केले की, परीक्षेपूर्वी एक गेस पेपर फुटला होता. ज्यातील अनेक प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत आले होते.

गेस पेपरमधील 120 ते 150 प्रश्न जसेच्या तसे (NEET UG Exam Cancelled)

नीट परीक्षेतील 180 प्रश्नांपैकी सुमारे 120 ते 150 प्रश्न हुबेहुब आले होते. ज्यामध्ये केमिस्ट्रिचे 30 आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न आले होते. तपासात असेही समोर आले की, पेपर सेट झाल्यानंतर तो छापण्यापूर्वीच प्रश्नांचा संच लीक झाला होता.

NTA ने परीक्षा रद्द् करण्याबाबत काय म्हटले आहे ? (NEET UG Exam Cancelled)

नीट परीक्षा रद्द कऱण्याबाबत NTA ने सांगितले की, आता या प्रकऱणाचा संपूर्ण तपास सीबीआय करेल आणि NTA या तपासाच पूर्ण सहकार्य करेल. तसेच NTA ने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांना त्रास होईल पण विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्याकरीता हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored