NEET Paper Leak Update : नीट पेपर लीक प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) चे प्रमुख अभिषेक सिंह हे गुरूवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले, त्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर मोठा दावा केला आहे.
दिल्ली : 22-05-2026
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा (NEET 2026 ) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळे (NEET Paper Leak Update) केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेतला, या प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने अनेक जणांना अटक केलं आहे., ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काहीजणांचा समावेश आहे. आरसीसीचे संचालक मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी, मनिषा मांढरे यांना सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे.
या प्रकरणात राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी (NTA) चे प्रमुख अभिषेक सिंह हे गुरूवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले. त्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर मोठा दावा केला आहे. नीट 2026 चा कोणताही पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र त्याती काही प्रश्न लीक झाले होते. असा दावा अभिषेक सिंह यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा आयोजित कऱणाऱ्या केंद्रीय एजन्सीकडून असा दावा कऱण्यात आला आहे की, परीक्षा रद्द कऱण्याचं प्रमुख कारण हे परीक्षेत झालेल्या गैरमार्गांचा वापर हे आहे.
अभिषेक सिंह यांचा दावा (NEET Paper Leak Update)
राष्ट्रीय टेस्टींगचे एजन्सीचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी स्थायी समितीसमोर असा दावा केला आहे की परीक्षेदरम्यान अनियमितता आणि गैरप्रकारांची उदाहरणं समोर आली आहेत. मात्र पेपर पुर्णपुणे लीक झाला नव्हता. परंतु नीटचे काही प्रश्न लीक होणं देखील गंभीर प्रकार आहे, यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणालीवरील विश्वास डळमळू शकतो. त्यामुळे ही परीक्षा रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.
अभिषेक सिंह आणि उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव विनीत जोशी यांनी संसदीय समितीला सांगितल की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. अधिकारी योग्य दिशेनं पुढे जात आहेत. पेपर लीक होऊ नये यासाठी काही शिफारशी लागू कऱण्यात आल्या आहेत. आणखी काही गोष्टींवर काम सुरू आहे. पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता,मात्र काही प्रश्न लीक झाल्यानं ही परीक्षा रद्द कऱण्यात आली, अशी माहीती संसदीय समितीला देण्यात आली आहे. दरम्यान आता 21 मे रोजी पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेतली जाणार आहे.