NCP Vaishali Nagwade : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षरदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : 05-08-2026
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे ( NCP Vaishali Nagwade ) यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन जबाबादारी सोपवलीये. भोंदू अशोख खरात प्रकऱणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
महिला प्रदेशाध्यक्षरदी वैशाली नागवडे यांची निवड अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान,’गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद असे 14 वर्ष काम कऱण्याची संधी मिळाली. या पुढची मोठी जबाबदारी समजून काम आता करायला हवं. अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली.
नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांचा परिचय ( NCP Vaishali Nagwade)
- वैशाली नागवडे यांचा राजकीय प्रवास
- पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट)
- पद : महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष
- जन्मतारीख : 11-02-1973
- शिक्षण : बी.कॉम. (एस.पी.कॉलेज)
- 2002-05 – संचालक – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
- 2005-2016 – संचालक- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
- 2007-2012 – सदस्य – पंचायत समिती, दौंड
- 2009-2021 – अध्यक्ष-पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस
- 2010 – अध्यक्ष-पंचायत राज कमिटी, महाराष्ट्र राज्य
- 2013- 2016 – अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
- 2014-2016 – संचालक NDDB- नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद, गुजरात
- 2014 – 2016 – संचालक IVRI – इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्युट, बरेली, उ.प्र.
राजकारणाची सुरूवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली. आज ते हवे होते, त्यांची कायम उणीव जाणवत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले. त्यामुळे आजा जबाबदारी खुप वाढली आहे. दादांची ‘कामाची माणूस’ ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायतं आहे. गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंदा दूध डेअरी चेअरपर्सन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद, असे 14 वर्ष काम कऱण्याची संधी मिळाली आहे. जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं. अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली. वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन अजितदादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळाली – निखिल ठाकरे ( NCP Vaishali Nagwade)
आज अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे. मोठी जबाबदारी आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो. संघटना ही नेत्याचा स्वाभिमान असतो. त्यांतून सूरज चव्हाण यांची घटना घडली होती. पुनः असं काही होणार नाही. अशी प्रतिक्रिया निखिल ठाकरे यांनी दिली आहे.
कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे दुःख समजायला हवे – नागवडे ( NCP Vaishali Nagwade)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबत कॉंग्रेसने केलेल्या टीकेबाबत बोलताना वैशाली नागवडे म्हणाल्या की, ‘पुणे शहरात आम्ही काल या विरोधात आंदोलन केले. शिव-शाहू- फुले-आंबेडकर विचारधारा जपणारा महाराष्ट्र आहे. कॉंग्रेसला सुनेत्रा पवार यांचं दुःंख कळायला हवे. हे अजिबात शोभणारे नाही. किती मोठे दुःख पचवून त्या कशा प्रकारे पदावर आल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत जबाबदारीने बोलणं गरजेचे होते.