Farmer Loan Waiver Update : महाराष्ट्रातील शेतकरी हे शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेची वाट पहात आहेत. आपल्या खात्यात योजनेचे पैसे कधी जमा होतील याचीच सर्वांनाच चिंता आहे. कर्जमाफीची तारीख जाहीर झालेली होती. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. कशामुळे वेळ लागलेला आहे, सरकारने कोणती नवीन तारीख जाहीर केलेली आहे, याचा आढावा घेऊ.
मुंबई : 07-08-2026
महाराष्ट्रातील शेतकरी अनेक महिन्यांपासून वाट पहात आहेत, त्या कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver Update ) रक्कमेची. शेतकरी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच तांत्रिक अडचणीने यात अडथळा आला आहे. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे अश्वासान सरकारने दिले होते. पण सध्या ते शक्य होताना दिसत नाही.
पुढील दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी तांत्रिक अडचणीचा मुद्द समोर आणला होता. 4 ऑगस्ट पासून कर्जमाफीचा रक्कम जमा होण्यास सुरूवात होणार होती. पण अडथळा आल्याने शनिवारी किंवा रविवारी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईल. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
12 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण (Farmer Loan Waiver Update )
पहिल्या टप्प्यात कमी रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. युद्धपातळीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर होणार आहे. ज्यांची पहिल्या यादीत नावे आली नाहीत. त्या शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. आत्महत्येसारऱख्या टोकाचे पाऊल टाकू नये असे आवाहनही भरणे यांनी केले.
17 लाखांहून अधिक पात्र शेतऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध (Farmer Loan Waiver Update )
आतापर्यंत 17 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कऱण्यात आल्या आहेत. यादीत नाव आल्यावर पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होणार आहे. गरजू आणि आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे.
त्यातून 96 करदात्या शेतकऱ्यांना आणि इतर अपात्र अशा जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये एक रुपयाही जमा होणार नाही. सध्या तांत्रिक अडचण दूर कऱण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा होईल.
This post was last modified on August 7, 2026 6:27 pm